सोशल मीडिया : एक विस्कटलेलं जग
मुलाखत : श्राबोंती बागची ——————————————————————————– रामचंद्र गुहा यांची ’सोशल मीडिया’ या विषयाला धरून घेतलेली मे २०१६ मध्ये factordaily.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली मुलाखत सोशल मीडियाआणि विचारभिन्नता या विषयासंदर्भात महत्त्वाची आहे. मूळ इंग्रजीमधील मुलाखतीचा हा संपादित अनुवाद. ——————————————————————————– प्रश्न– इतिहासाचे विकृतीकरण करणे, ऐतिहासिक गोष्टींचा विपर्यास करणे आणि सोयीस्करपणे इतिहासाकडे बघणे या सध्या घडत असलेल्या गोष्टींसाठी सोशल …