तीन कविता
कापूस उलंगून गेल्यावर******************** कापूस उलंगून गेल्यावरकाहीच नाही राहत शिल्लकआशा,निराशा अन्वाळलेल्या पऱ्हाट्याशिवाय कापूस उलंगून गेल्यावरशिकारीसाठी दडून बसलेल्या शिकाऱ्यासारखेदडून बसलेले सावकार अलगद पडतात बाहेरजे बहुतांश स्वतःच असतात व्यापारीही.मिरगात सरकी, खात-मूतासाठी कधीतरी घेतलेलेउसने पैसे वसूल करण्यासाठी लावतात तगादाअन्नेमका डाव साधूनघेतात कापूस बेभाव विकत कापूस उलंगून गेल्यावरअनेक स्वप्नांच पीक ओरबाडून नेलं जातंचोराने अर्ध्या रात्री कापूस चोरून नेल्यासारखं मुलांचे कपडे,मुलीची …