‘टिळक विरुद्ध आगरकर’
सामाजिक सुधारणा की राजकीय स्वातंत्र्य यांमध्ये अग्रक्रम कशाला यासंबंधी लोकमान्य आणि आगरकर या मित्रद्वयांमध्ये टोकांचे मतभेद होते हे महाराष्ट्रातील सर्व सुशिक्षित जनांना माहीत आहे. १६ जून १८९५ ला प्रिन्सिपल गोपाळ गणेश आगरकरांना देवाज्ञा झाली. त्यानंतर २१ वर्षांनी मुंबईला त्यांचा स्मरणदिन म्हणून मोठा समारंभ झाला. त्यावेळी प्रसंगाला अनुसरून लोकमान्यांनी ‘आगरकरांची श्राद्धतिथी’ म्हणून केसरीमध्ये जो लेख लिहिला …