ललिता गंडभीर - लेख सूची

भ. पां. पाटणकर यांच्या पत्रास हे उत्तर

“पुरुष अजूनी भूतकाळात राहात आहेत म्हणून पा चात्त्य कुटुंबव्यवस्था खिळखिळी होत आहे’ असे विधान माझ्या लेखात आहे (जाने. २००२). त्याला आशा ब्रह्म यांच्या लेखातल्या विधानांना जोडून भ. पां. पाटणकर यांनी एक (? विनोदी) निष्कर्ष काढला आहे “स्त्रिया (? उपय) नैतिक मूल्यांच्या मागे लागल्या आहेत.’ पा चात्त्य स्त्रिया ज्या मूल्यांचा पुरस्कार करत आहेत त्यांची थोडक्यात यादी …

हक्क केवळ मातेचाच

वसंत पळशीकर यांच्या लेखात (आ.सु. सप्टें. २००१) पुढील विधान आहे. “मुलांना जन्म देणे, अर्भकावस्थेत त्यांचे पोषण व संगोपन करणे हे कार्य सामान्यपणे माता बनणाऱ्या स्त्रीचे राहावे हे स्वभाविक व इष्टही आहे. ते अटळही आहे.” “एकदा मुलाचा जन्म झाल्यावर त्याचे पोषण व संगोपन करणे हे मातेचे काम व ते स्वाभाविक व इष्टही आहे” ह्या वसंत पळशीकरांच्या …

मातृत्व

हा लेख वाचण्या आधी वाचकाला थोडी पार्श्वभूमी समजणे महत्त्वाचे आहे. माझी आई मी तीन वर्षांची असताना मृत्यू पावली. एकत्र कुटुंबात माझ्या काकीने मला प्रेमाने वाढवले. म्हणून मला आईची अनुपस्थिती जाणवलीही नसती, पण भोवतालच्या समाजाने ती जाणवून दिली. आईवेगळी मुलगी म्हणून शेजारी, नातेवाईक माझी कीव करीत. वडिलांचे मित्र मुलींना आईची जरुरी असते म्हणून माझ्यासमोर वडिलांना दुसरे …

मेपुरे आणि दियदे

अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये झालेले मेळाव्यातील प्र. ब. कुळकर्णी यांच्या वृत्तांताबद्दल हे पत्र लिहीत आहे. पुढची चर्चा आचार्य रेगे व प्रो. दि. य. देशपांडे यांच्या मतभेदाविषयी आहे. आचार्य रेगे यांचे मत ‘धर्मसुधारणेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन साधणे योग्य असे होते.’ तर प्रो. दि. य. देशपांडे हे ‘समाजास’ “धर्म, देव हानिकारक असल्याने समाजसुधारणेसाठी विवेकवादाकडे समाजास वळवावे’ ह्या (कडव्या) …

आदम आणि बाळाची आई

अमेरिकन निसर्गशास्त्र संग्रहालयातले डायनोसॉर्जचे प्रदर्शन पाहून आलेला आदम न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये एका बाकावर बसला आहे, संध्याकाळच्या वेळी, आपल्या जीवजातीच्या हलचाली पाहात. “आणि ही एवढी सारी माणसं म्हणजे पृथ्वीच्या साऱ्या लोकसंख्येचा एक छोटासा भाग! सारे माझ्या नात्यातले! सारे, सारे! हौवा हवी होती बरोबर. तिला मनापासून आनंद झाला असता. नातलग भेटला की तिचा स्वतःवर ताबा नाही राहात. …

श्री. ह. चं. घोंगे ह्यांच्या लेखाला (ऑ. २०००) हे माझे उत्तर

स्त्रियांच्या योनिशुचितेला दिल्या गेलेल्या अवास्तव महत्त्वाची स्त्रियांनी जबरदस्त किंमत मोजली आहे. माझ्या मते स्त्रियांना योनिशुचितेच्या कल्पनेच्या बेडीतून मुक्त करण्याची अत्यंत जरुरी आहे. त्यामागचे हेतू श्री. घोंगे लिहितात त्या लेखापेक्षा पूर्ण वेगळे आहेत. १. विवाहपूर्व, विवाहित अथवा वैधव्यात कामेच्छा पूर्ण करण्यास संधी स्त्रीला मिळावी हा माझा हेतू नाही. २. “अनोळखी स्त्रीपुरुषांनी जवळीक साधायची कशी?” “साठी उलट-लेल्या …

थॉमस जेफर्सनचे वंशज

क्रोमोसोमवरच्या डि.एन.ए.ची चाचणी करून वंशावळ ठरवता येते हे सिद्ध झाले तेव्हा काही वादग्रस्त, रहस्यमय व सामाजिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे प्रश्न सुटतील असा संभव निर्माण झाला. अश्या चाचणीने, “थॉमस जेफर्सन व सॅली हेमिंग्स ही त्यांची गुलाम स्त्री (स्लेव्ह) यांना मूल झाले होते काय” ह्या वादग्रस्त प्रश्नाला आता उत्तर मिळाले.जेफर्सन हे जिवंत होते तेव्हाच त्यांच्या लैंगिक संबंधांबद्दल …

चर्चा

हिन्दु कोण? आपल्या में ९९ च्या संपादकीयामध्ये “ज्याने परदेशाचे नागरिकत्व स्वीकारले त्याला आपल्याला हिंदू म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. हिंदुत्वाचे मुख्य लक्षण ह्या भूमीवरची निष्ठा आहे” अशा धर्तीची विधाने आहेत. मला संपादकांना पुढील प्रश्न विचारावयाचे आहेत. १. भारताचा नकाशा कायम वदलत आलेला आहे. (उदा. वांगला देश, पाकिस्तान) असे झाले तर भारतावाहेर राहिलेले हिंदू अहिंदू होणार का? …

रोमन लोकशाही

रोमन नागरिकांची स्वतःच्या राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाची (identity) जाणीव दोन कल्पकथांमध्ये (myth) रुजलेली होती. एनियस हा रोमचा मूळ पराभूत संस्थापक ट्रॉयच्या युद्धानंतर (१२०० ख्रिस्तपूर्व) वडिलांना खांद्यावर घेऊन, मुलाला हाताशी धरून निर्वासितांसह देशोधडीस लागला. त्याच्या वडिलांच्या हातात त्यांच्या देवाच्या मूर्ती होत्या. एनियस ट्रॉयमध्ये युद्धात हरणेआवश्यकच होते. कारण त्याच्या नियतीत (destiny) रोमची स्थापना करणे होते. (प्रत्यक्षात एनियसच्या नंतर अनेक …

स्पार्टाची लोकशाही

ग्रीस हा देश अनेक बेटांचा, उंच डोंगर व खोल दन्यांचा आहे. ह्या देशाला वेडावाकडा समुद्रकिनारा आहे. परिणामी जरी ग्रीक स्वत:ला “एकच विशिष्ट जमात’ असे मानत असले तरी सगळ्या ग्रीसला एकाच राजवटीच्या अंमलाखाली आणणे कुणाला जमले नाही. ख्रिस्तपूर्व ५०० सनाच्या सुमाराला ग्रीसमध्ये फक्त एकाच शहराचा देश (city state) असे ३०० देश स्थापन झालेले होते. ह्या सर्व …