मला आस्तिक व्हायचे आहे
परमेश्वर आहे की नाही हा वाद बहुधा हजारो वर्षांपासून सुरू असावा आणि पुढे किती वर्षे चालू राहील हे त्या परमेश्वरालाच ठाऊक! किंवा, तो नसला तर, कुणास ठाऊक हे कुणास ठाऊक! त्यामुळे ज्या वादांतून काहीही निष्पत्ती होणे शक्य नाही, अशा वादांत हा वाद अग्रणी धरला जावा. ईश्वर नसल्याबाबतचे लाखो पुरावे, कारणे आणि शास्त्रीय मीमांसा नास्तिकांतर्फे दिल्या …