वसंत पळशीकर - लेख सूची

“धर्मप्राय” श्रद्धा

आ.सु.(१२.५) मध्ये श्री. सुधीर बेडेकर यांचे ‘धर्मश्रद्धा आणि दि. के. बेडेकर’ हे टिपण प्रसिद्ध झाले आहे. आंदोलन या मासिकाच्या ऑगस्ट २००० च्या अंकात माझा ‘धर्मप्राय श्रद्धेची सार्थकता’ हा लेख प्रसिद्ध झाला. त्याचा संक्षेप आ.सु. (११.८) मध्ये प्रसिद्ध झाला व त्यावर श्री. दि. य. देशपांडे यांची टिप्पणीही प्रसिद्ध झाली. प्रस्तुत संक्षेप मी केला नव्हता; तसेच, तो …

कुटुंबकेन्द्रित समाज आणि स्त्री-केन्द्रित कुटुंब (२)

‘स्त्रीकेन्द्रित कुटुंब’ याचा अर्थही स्पष्ट करण्याची गरज आहे. कुटुंब हे किमान द्विकेन्द्री तर असते, व असायलाही हवे. ते बहुकेन्द्री असणे अधिक इष्टही ठरेल. पण ‘स्त्रीकेन्द्री’ असे म्हणण्यामागे, आजचे बिघडलेले संतुलन पुन्हा एकवार दुरुस्त करण्याची गोष्ट प्रधान असावी. कुटुंबाच्या गाभ्याशी मुले व त्यांचे संगोपन ही गोष्ट आहे. याचाच अर्थ मातृत्व व पितृत्व या दोन्ही भूमिका योग्य …

कुटुंबकेन्द्रित समाज आणि स्त्री-केन्द्रित कुटुंब (१)

चिं. मो. पंडित यांनी (आ.सु. ११.११, १२.३) एका मोठ्या व महत्त्वाच्या विषयाला तोंड फोडले आहे. भविष्यातली समाजव्यवस्था ‘स्त्री-केन्द्री कुटुंबव्यवस्थे’ वर आधारित असावी असे मत मांडणाऱ्यांचा भूमिकेची ते वेगवेगळ्या अंगांनी पाहणी / तपासणी करतात. यासाठी जो ‘अप्रोच’ त्यांनी घेतला आहे व जी पद्धती अवलंबिली आहे ती फलदायी ठरण्याची शक्यता आहे. कुटुंब हे समाजाच्या बांधणीचे पूर्वापार प्राथमिक …

धर्मप्राय श्रद्धेची सार्थकता

निसर्गसृष्टीतील घडमोडींविषयीचे वैज्ञानिक अज्ञान, त्यापोटी वाटणारे भय आणि येणारे दुबळेपण, निसर्गाच्या अनाकलनीय शक्तींना ‘संतुष्ट’ करून स्वतःचे जीवन आश्वस्त, सुरक्षित व समृद्ध करण्याची कांक्षा व धडपड यामधून ‘धर्म’ या गोष्टीचा उदय झाला, ही एक ‘बुद्धिप्रामाण्यवादी’ वर्तुळातील प्रतिष्ठित व शिष्टमान्य मांडणी आहे. आधुनिक विज्ञानाच्या युगाच्या उत्कर्षाने ज्ञानाची प्रभा सर्वदूर पसरल्या-नंतर, ज्ञानांधकारात भरभराटलेल्या धर्माची व धर्मसंस्थेची गरज संपुष्टात …

धारणात् धर्म इत्याहुः।

नोव्हेंबर-डिसेंबर १९९२ ते जून १९९३ या दरम्यान आजचा सुधारकच्याअंकांमधून दि.य.देशपांडे, श्री. गो. काशीकर व दिवाकर मोहनी यांच्यात झालेली चर्चा परवा सलगपणे वाचली. वेगळ्या दिशेने मुद्याला भिडायला हवे असे मला दिसते. काशीकर म्हणतात त्याप्रमाणे ‘समाजाचा घटक ह्या नात्याने म्हणजे समाजधारणेच्या दृष्टीने उपयुक्त असा व्यक्तींचा आचार-विचार-समूह म्हणजे धर्म ही व्याख्या करून चर्चेला आरंभ होऊ शकतो. (१) आधुनिकपूर्व …

परिसंवाद निसर्ग आणि मानव – २

साधनाच्या (१८ जुलै) अंकातील ‘निसर्ग आणि मानव या आपल्या लेखात श्री. नानासाहेब गोरे यांनी म्हटले आहे, आदिम क्षणापासून या चालू घटकेपर्यंत निसर्ग होता तसाच राहिला आहे : लहरी, निर्हेतुक.’ त्यांनी मानवाचे आणि निसर्गाचे स्वर पूर्वीच्या काळी कधी तरी खरोखर जुळले होते का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. लेखाच्या अखेरीस ‘स्वस्थितिमग्न निसर्ग व विज्ञानधर पुरुषार्थी मानव …

परिसंवाद निसर्ग आणि मानव -५

दि. य. देशपांडे यांना उत्तर – उत्तरार्ध वसंत पळशीकर (या लेखाचा पूर्वार्ध आजचा सुधारकमार्च ९३ या अंकात आला आहे.) ६ डेव्हिड बोम (Bohm) या भौतिकी वैज्ञानिकांचे एक विधान पुढीलप्रमाणे आहे: ‘We have seen that each world-view holds within itself its own basic notions of order. What is order ? How we do presuppose that there …

चर्चा प्रा. शेषराव मोरे यांनी सादर केलेल्या पुराव्यांविषयी

आजचा सुधारक फेब्रुवारी १९९३ च्या अकांत प्रा. शेषराव मोरे यांनी माझ्या संदर्भात काही विधाने केली आहेत (पृ. ३४८-५०).पृ. ३५० वर ते म्हणतात, ‘अवतरणे जेथून घेतली त्या ग्रंथातील पृष्ठांकांचा उल्लेख पळशीकरांनी कुठेही केलेला नाही. मूळ हस्तलिखितात असे पृष्ठांक होते, मात्र प्रकाशित लेखात पळशीकरांनी ते येऊ दिलेले नाहीत, याचा पुरावा आम्ही ग्रंथात सादर केलेला आहे. सावरकरांना अनुवंशवादी …

पत्रव्यवहार धर्माचा स्वीकार व विवेकनिष्ठा

कोणत्याही गोष्टीचे अस्तित्व वा नास्तित्व सिद्ध करण्यासाठी आपण पुरावा ग्राह्य (अग्राह्य /पर्याप्त/ अपर्याप्त मानतो तेव्हा आपण एका चौकटीत तो निवाडा करीत असतो. त्या चौकटीत त्या गोष्टीचे त्या चौकटीतील विशिष्ट अर्थाने अस्तित्व नाही, व कधीच सिद्ध होऊ शकणार नाही, असे विधान करता येईल. ऐंद्रिय अनुभवप्रामाण्यवाद वा बुद्धिप्रामाण्यवाद या चौकटीत ज्यांचे नास्तित्व स्वीकारावे लागते अशा काही गोष्टी …

संपादकीयांविषयी

आजचा सुधारकच्या नोव्हेंबर-डिसेंबर १९९२ च्या अंकातील दोन्ही संपादकीयांविषयी काही प्रतिक्रिया येथे नोंदवू इच्छितो. (१) डॉ. रूपा कुळकर्णी यांच्या संदर्भातील संपादकीय आजचा सुधारक हे विवेकवादाला वाहिलेले मासिक आहे याचा अर्थ धर्म स्वीकारणाच्या व्यक्ती संपादक वा सल्लागार राहू शकत नाहीत असा करणे अविवेकी आहे. अंतिमतः ईश्वराच्या एक ना एक स्वरूपाच्या अस्तित्वाच्या स्वीकारावर धर्माची उभारणी होते असे मानले …