विजय पाष्टे - लेख सूची

पटरी

मुंबई. घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा करणारं, ऐन रात्रीतही टक्क जागं राहत कधीच न झोपणारं शहर. स्वत:चं हे वेगळेपण जपण्यासाठीच का माहीत नाही, नेहमीप्रमाणं आजही ते झोपलं नव्हतं. याच जागरणं करणाऱ्या मुंबईतला सेंट्रल गव्हर्नमेंट हाऊसिंग कॉलनीमुळे सुप्रसिद्ध असलेला अँटॉप हिल विभाग. त्यालाच खेटून असलेली बांडगुळासारखी वाढत गेलेली कुप्रसिद्ध समजली जाणारी अँटॉप हिल झोपडपट्टी. रात्रीच्या म्हणा किंवा मग …