विद्यागौरी खरे - लेख सूची

‘द नेकेड ॲण्ड द न्यूड’

[बघण्याच्या पद्धती  (Ways of Seeing) हे पुस्तक जॉन बर्गर ह्यांच्या बी.बी.सी. टेलिव्हिजन सीरीजवर आधारलेले आहे. 1972 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ह्या पुस्तकाने पाश्चात्त्य कलाकृतींकडे बघण्याची नवी दृष्टी दिली. पाच लेखकांनी मिळून हे पुस्तक ‘घडवले’ आहे. ‘बघणे बोलण्याच्या आधी येते. बोलायच्या आधी मूल बघायला आणि ओळखायला शिकते’ ह्या वाक्यापासून सुरुवात झालेले हे पुस्तक आपले बघणे हे आपल्या …

विस्तारणारी क्षितिजे

नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात नागपूरमध्ये दृश्यकलेचा एक अभूतपूर्व उत्सव साजरा केला गेला. “विस्तारणारी क्षितिजे’ नावाचे आधुनिक आणि समकालीन भारतीय दृश्यकलेचे एक प्रदर्शन त्या काळात नागपूरमध्ये भरले होते. ह्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आणि जणुकाही त्याच्या स्वागतासाठी म्हणून नागपुरातील सिस्फा आर्ट गॅलरीने शहरातील लहान-मोठ्या आर्ट गॅलरीजमध्ये अनेक छोटी छोटी प्रदर्शने भरवली होती. आठवडाभर नागपुरातील चित्ररसिकांना कलेची एक मेजवानीच …

सीमांतापासून सीमांतापर्यंत दलित

समकालीन वादविवादांमध्ये उपेक्षित वर्गांच्या (disadvantaged groups) सामाजिक बहिष्कृतीची आणि समाजातील मुख्य प्रवाहाच्या बाहेर असण्याची (marginalisation) चर्चा वारंवार होते. बहिष्करणाच्या ह्या चर्चेने पूर्वी वापरात असलेले शोषण, वर्चस्व आणि दडपणूक हे शब्द मागे टाकले आहेत. बहिष्कृती आणि marginalisation ला प्रतिक्रिया म्हणून वेगळ्या संज्ञा प्रचलित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. उदा. अधिकाराचा आग्रह (entitlement), सबलीकरण (empowerment) आणि सामाजिक …

‘द नेकेड ॲण्ड द न्यूड’

[बघण्याच्या पद्धती (Ways of Seeing) हे पुस्तक जॉन बर्गर ह्यांच्या बी.बी.सी. टेलिव्हिजन सीरीजवर आधारलेले आहे. १९७२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ह्या पुस्तकाने पाश्चात्त्य कलाकृतींकडे बघण्याची नवी दृष्टी दिली. पाच लेखकांनी मिळून हे पुस्तक ‘घडवले’ आहे. ‘बघणे बोलण्याच्या आधी येते. बोलायच्या आधी मूल बघायला आणि ओळखायला शिकते’ ह्या वाक्यापासून सुरुवात झालेले हे पुस्तक आपले बघणे हे आपल्या …

भयमुक्त शिक्षणासाठी

काही दिवसांपूर्वी नागपूरच्या वर्तमानपत्रांमधून दोन विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्येच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. ही मुले विद्यार्थी होती आणि शिक्षणाशी संबंधित व्यवहारातून ती आत्महत्येला प्रवृत्त झाली. एका विद्यार्थ्याला कॉपी केल्या-बद्दल शिक्षकांनी बेदम मारहाण केली म्हणून त्याने आत्महत्या केली आणि दुसऱ्याने परीक्षेतील अपयशामुळे नैराश्य येऊन आत्महत्या केली. परीक्षा आणि त्यातील यशापयश ह्याचा आणि पर्यायाने शिक्षणाचाही विचार फार व्यापक पातळीवर …

प्रोब—-पब्लिक रिपोर्ट ऑन बेसिक एज्युकेशन इन इंडिया–४

प्राथमिक शिक्षणावरच्या प्रोबच्या अहवालावरील हा शेवटचा लेख. आत्तापर्यंतच्या तीन लेखांत त्यांतील पहिल्या पाच प्रकरणांचा जरा विस्ताराने आढावा घेतला. ह्या शेवटच्या लेखात उरलेल्या प्रकरणातील काही महत्त्वाचे मुद्दे फक्त त्रोटक-पणे नोंदून हिमाचल प्रदेशामध्ये झालेल्या ‘शैक्षणिक क्रांतीची’ माहिती मात्र विस्तृतपणे देत आहे. आतापर्यंत प्रोब अहवालात वरचेवर येणारे ‘निराशा’, ‘निरुत्साह’, ‘जबाबदारीची उणीव’ ह्या शब्दांऐवजी ‘प्रोत्साहन’, ‘उत्साह’, ‘जबाबदारीची जाणीव’ ह्या …

प्रोब—-पब्लिक रिपोर्ट ऑन बेसिक एज्युकेशन इन इंडिया–३

४. शाळा–परिसर, सोयी, वातावरण १. अपुऱ्या सोयी —- प्रोब सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागात शाळांची संख्या वाढली आहे. शाळेला क्रीडांगण असणे, शाळेत खडू–फळा असणे, ह्यासारख्या सोयीही वाढल्या आहेत. पण तरीही शाळेच्या एकूण घडणीसाठी ह्या सोयी फार अपुऱ्या आहेत. नियमानुसार शाळेला निदान दोन पक्क्या खोल्या, दोन शिक्षक, शिकवण्यासाठी फळे, नकाशे, तक्ते, ग्रंथालये यांसारखी साधने असायला हवीत. प्रोब राज्यांमधल्या …

प्रोब—-पब्लिक रिपोर्ट ऑन बेसिक एज्युकेशन इन इंडिया-२

प्रोब अहवालाची एक विस्तृत प्रस्तावना डिसेम्बर २००० च्या आ.सु.च्या अंकात प्रसिद्ध केली होती. उरलेल्या अहवालाचा संक्षेप करताना जाणवले की अहवालातील प्रत्येक मुद्दाच नव्हे तर त्या मुद्द्यांचा विस्तारसुद्धा महत्त्वाचा आहे त्यामुळे त्या सगळ्याचा गोषवारा एक लेखात उरकणे हे फार कठीण काम आहे. म्हणून लेखांची संख्या वाढवायचे ठरवले. तरीही आकडेवारी, तक्ते आणि असंख्य उदाहरणे–ज्यामुळे ह्या अहवालाला एक …

प्रोब—-पब्लिक रिपोर्ट ऑन बेसिक एज्युकेशन इन इंडिया—१

पब्लिक रिपोर्ट ऑन बेसिक एज्युकेशन इन इंडिया हा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने १९९९ मध्ये प्रसिद्ध केलेला अहवाल हातात आला तेव्हा त्याच्या दोन वैशिष्ट्यांमुळे तो वाचण्याची उत्सुकता वाढली. एक म्हणजे हा सरकारी कमिटीने सरकारसाठी ‘बनवलेला’ अहवाल नव्हता तर काही जागरुक संशोधकांनी सेंटर फॉर डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स ह्या दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील विभागाच्या मदतीने भारतीय नागरिकांसाठी तयार केलेला भारतातील …

समाजवाद, बाजारपेठा आणि लोकशाही

गेले काही दिवस समाजवादी तत्त्वांची पिछेहाट वेगाने होत आहे आणि भांडवलशाहीचे नव्याने कौतुक होत आहे. हे कौतुक बाजारपेठांवर आधारित असलेल्या अर्थव्यवस्थांच्या देदीप्यमान यशामुळे होत आहेच पण समाजवादी देशांच्या पिछेहाटीमुळेही होत आहे. सोव्हिएट रशियां, पूर्व युरोपीय देश आणि चीन ह्यांसारख्या देशांमध्ये पारंपरिक समाजवादी पद्धतींपासून अलग होण्याची प्रक्रिया जोरात सुरू झाली आहे. समाजवादी तत्त्वांची छाननी, अंतर्गत टीका …