विद्वद्रत्न केशव लक्ष्मण दप्तरी - लेख सूची

तर्क अप्रतिष्ठित कसा?

“तर्क अप्रतिष्ठित आहे म्हणून दुसऱ्या रीतीने म्हणजे वचनप्रामाण्याने अनुमान करावे असे तुमचे (म्हणजे पूर्वपक्षाचे) म्हणणे असेल तर ते चूक आहे. कारण ह्याप्रमाणे देखील तुमची (म्हणजे पूर्वपक्षाची) ह्या अप्रतिष्ठितत्वाच्या आक्षेपा-तून सुटका होत नाही. शब्दप्रामाण्य मानल्यास शब्द अनेकांचे आहेत व त्यांचे अर्थही अनेक करता येतात. म्हणून शब्दप्रामाण्यच अप्रतिष्ठित आहे. म्हणून तर्क अप्रतिष्ठित मानू नये आणि तर्काने सिद्ध …

ग्रंथ भ्रामक होऊ शकतात

अनुभव व स्वतंत्र विचार हेच ज्ञानाचे खरे साधन होय. ग्रंथ केवळ मार्गदर्शक आहेत व कित्येक वेळी तर भ्रामकही होतात. म्हणून कोणत्याही संशोधकाने स्वतःच्या अनुभवावरून स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. इतिहासात मात्र घडलेल्या गोष्टी ज्यांनी स्वतः पाहिल्या त्यांची वचने मुख्य प्रमाण मानली पाहिजेत. संशोधन करण्यात कितीही श्रम पडले तरी ते टाळू नका. असे करात्न तरच तुम्हास सिद्धी …

कालचे सुधारक:

गुणग्राहक आदि शंकराचार्यांनी बादरायण व्यासांच्या ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिले. त्या शांकरभाष्यामधले तर्कदोष दाखवून व्यासांतर्फे शंकराचार्यांवर फिर्याद लावणारे केशव लक्ष्मण दप्तरी (१८८०-१९५६) हे एक लोकविलक्षण पुरुष नागपुरात होऊन गेले. हा थोर तत्त्वज्ञ पूर्णतया इहवादी असूनसुद्धा जीवनाच्या ऐहिक बाजूबद्दल अत्यंत उदासीन होता. दप्तरींचे कपडे घालण्याचे काही ठराविक नियम होते. उन्हाळ्यात अमक्या तिथीपासून तमक्या तिथीपर्यंत खादीचा सुती सदरा आणि …