वि. शं. ठकार - लेख सूची

आजचे विज्ञान आणि अध्यात्म

रस्तोरस्ती कानाला मोबाईल फोन लावून चालणारी सुशिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत माणसे पाहिली म्हणजे जाणवते, विज्ञानाची किती झपाट्याने घोडदौड चालू आहे! परवा आमचा एक तरुण भाचा लग्न ठरल्याचे सांगत आला, आणि खिशातला फोन काढून, ‘बोला ना तिच्याशी’ असे म्हणत, बटने वगैरे न दाबता, नुसते ‘नीलिमा’ अशी हाक मारून आपल्या भावी बायकोला आमची ओळख करून देऊ लागला, तेव्हा अवाक् …