पुस्तक परीक्षणः ‘ऑपरेशन यम्’ एकविसाव्या शतकाची कादंबरी
‘ऑपरेशन यमू’ ही मकरंद साठेलिखित अवघ्या एकशेसहा पानांमध्ये आटोपणारी कादंबरी हाती आली नि एक अप्रतिम कादंबरी वाचल्याचे अपूर्व समाधान देऊन गेली. “ही खरीखुरी एकविसाव्या शतकाची कादंबरी आहे” अशा शब्दात महेश एलकुंचवारांनी मलपृष्ठावर तिचा गौरव केलेला दिसतो. निवेदिका ललिता नि तिचा मित्रपरिवार एकविसाव्या शतकातील जिणे जगतात. ललिता एका दूरचित्रवाणीची वार्ताहर आहे (वय वर्ष बेचाळीस). प्रत्येक घटनेत …