‘आश्रमहरिणी’च्या निमित्ताने
आश्रमहरिणी ही वामन मल्हार जोशी यांची एक वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी. वामनरावांची कलात्मकता, त्यांची वैचारिकता आणि त्यांची प्रागतिक सामाजिक विचारसरणी या कादंबरिकेत प्रभावीपणे प्रगटली आहे. धौम्य-सुलोचना – भस्तिगती यांची त्रिकोणी प्रेमकथा एवढाच या कादंबरीचा आशय नाही, तर विधवापुनर्विवाह आणि अपवादात्मक परिस्थितीत द्विपतिकत्वही समर्थनीय ठरू शकते असे प्रतिपादन करणारी ही कादंबरी आहे. बालविवाहाचा निषेध आणि विधवा-पुनर्विवाहाचा पुरस्कार एकोणिसाव्या …