श्रीनिवास नी. माटे - लेख सूची

त्या कृष्णसागरावरती

त्या कृष्णसागरावरती विश्वाच्या लाटा येती गंगांचे फेस उधळती बुडबुडे ग्रहांचे उठती | त्यातील नील गोलाला म्हणतात आपली धरती धरणीच्या पायघड्यांतून या पर्वतमाला घडती | अन् सप्तसमुद्रांवरती जलदांच्या राशी झुलती वाऱ्यावर लहरत जाता अचलांवर करती वृष्टी | की हरित जटा शंभूच्या वृक्षावली दाट उगवती फेसाळत उंच कड्यांतून ओघांच्या सरिता बनती | वेळूवनातून जाता वाऱ्याची गीते होती …

किसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश

सध्या भारतात जो किसान विरुद्ध सरकार लढा चालू आहे त्यावरून आणि लोकशाहीला मारक, तसेच जाचक असणारे इतर अनेक कायदे, रोज नवीन नियम जे महापुरासारखे किंवा महामारीसारखे देशभर पसरत आहेत ते पाहता भारतातील निधर्मी राज्यघटना आणि लोकसत्ता लवकरच संपुष्टात येतील अशी सार्थ भीती वाटू शकेल. अमेरिकेतसुद्धा ‘शेतकी उद्योजक कॉर्पोरेशन्स’नी शेतजमिनी गिळंकृत केल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. …