श्रीनिवास हेमाडे - लेख सूची

नीतिशास्त्राचा आधुनिक परिचय – प्रस्तावना

‘आजचा सुधारक’चा ऑक्टोबर, २०२२ चा अंक नेहमीप्रमाणे अतिशय वाचनीय आणि चिंतनीय झाला आहे, हे निःशंक आहे. त्यासाठी मी लेखक आणि संपादक यांचे मनापासून अभिनंदन करतो.  या अंकात तात्त्विक (Philosophical) अंगाने बरेच लेखन आढळते. विश्वविख्यात तत्त्ववेत्ता बर्ट्रांड रसेल (Bertrand Arthur William Russell, जन्म:१८ मे १८७२-०२ फेब्रुवारी १९७०) याच्या ‘A Philosophy for Our Time’ या लेखाच्या श्रीधर …

जगण्याचे वियाग्रीकरण : जगाची नवी ओळख

“प्रिय आईबाबा आणि माझ्या बंधूंनो, इथे फार कठीण दिवस आले आहेत, आणि मी जवळपास दर आठवड्याला तुम्हांला पत्र का लिहितोय, हे तुम्हांला समजत असेलच. आज मी तुम्हांला लिहीत आहे ते मुख्यतः आणखी काही पेर्वीटीन गोळ्यांसाठी…..” तुमचा आवडताहेन तो दिवस होता ९ नोव्हेंबर १९३९. नाझीव्याप्त पोलंडमध्ये २२ वर्षांचा एक तरुण जर्मन सैनिक आपल्या आईवडिलांना पत्र लिहीत …

भारतीय चर्चापद्धती : 6 वादपद्धती: उच्च, उदात्त पण वर्णग्रस्त, पक्षपाती!

कौटिल्यीय अर्थशास्त्र, चरकसंहिता, वादविद्या, चातुर्वर्ण्य ——————————————————————————–          भारतीय चर्चापद्धतीचा इतिहास सांगणाऱ्या ह्या लेखमालेच्या ह्यापूर्वीच्या भागांमध्ये आपण आन्वीक्षिकीचा परिचय करून घेतला. ह्या पद्धतीचे उपयोजन तज्ज्ञ मंडळींमध्ये मानवी आरोग्यविषयक चर्चा घडविताना प्रभावी पद्धतीने कसे केले जात होते ह्याचे दाखले चरकसंहितेत अनेक ठिकाणी मिळतात. त्यांतील वादांचे स्वरूप व परिभाषा ह्यांचा परिचय ह्या अंतिम लेखात करून दिला आहे. ——————————————————————————– …

भारतीय चर्चापद्धती: 5 चरकसंहिता : वाद आणि वादपरिभाषा

चर्चापद्धती, चरकसंहिता, वादविद्या, परिभाषा भारतीय चर्चापद्धतीचा इतिहास सांगणाऱ्या ह्या लेखमालेच्या ह्यापूर्वीच्या भागांमध्ये आपण आन्वीक्षिकीचा परिचय करून घेतला.ह्या पद्धतीचे उपयोजन तज्ज्ञ मंडळींमध्ये मानवी आरोग्यविषयक चर्चा घडविताना प्रभावी पद्धतीने कसे केले जात होते ह्याचे दाखले चरकसंहितेत अनेक ठिकाणी मिळतात. त्यांतील वादांचे स्वरूप व परिभाषा ह्यांचा परिचय ह्या लेखात करून दिला आहे. चरकाचार्यांनी परिषदेचे स्वरूप सांगून नंतर प्रत्यक्ष …

भारतीय चर्चापद्धती: 4 – चरकसंहिता : वादविद्येचे प्रात्यक्षिक

चर्चापद्धती, चरकसंहिता, वादविद्या ——————————————————————————–          ‘भारतीय चर्चापद्धती’चा इतिहास सांगणाऱ्या ह्या लेखमालेच्या ह्यापूर्वीच्या भागात आपण आन्वीक्षिकीचा परिचय करून घेतला. आयुर्वेदाने ह्या पद्धतीचे उपयोजन तज्ज्ञ मंडळींमध्ये मानवी आरोग्यविषयक चर्चा घडविताना अतिशय प्रभावी पद्धतीने केले. चरकसंहितेच्या आधाराने लिहिलेल्या ह्या लेखातील विद्वज्जनांच्या परिषदांबद्दलची अनेक निरीक्षणे आजही प्रासंगिक ठरू शकतील. ——————————————————————————–          आन्वीक्षिकीचा एक मुख्य विषय बनलेली हेतुविद्या (तार्किक कारणांचा …

भारतीय चर्चापद्धती : 3 – आन्वीक्षिकी

चर्चापद्धती, वाद, आन्वीक्षिकी —————————————————————————– ‘भारतीय चर्चा पद्धती’ च्या पहिल्या भागात आपण ‘वाद’ या संकल्पनेचे आणि पद्धतीचे स्वरूप पहिले. दुसऱ्या भागात ‘वाद’शी समांतर इतरही काही संकल्पनांचा थोडक्यात परिचय करून घेतला. भारतीय वादपद्धतीचा संबंध ‘आन्वीक्षिकी’ या विद्येशी जोडला जातो. या विद्येच्या स्वरूपात प्राचीन इहवाद आढळतो. आजच्या इहवादाशी हा इहवाद जुळणारा आहे. वादाचे प्रमेय व विषय अध्यात्मवादी न …

भारतीय चर्चापद्धती – १ : स्वरूप

वादविवादातील सहभागी घटक, वादाचे पद्धतिशास्त्र आणि खंडन-मंडनाचीप्रक्रिया यांचा निर्देश भारतीय परंपरेत मूलतः आहे. तिचे यथार्थ स्वरूपसमजावून घेणे ही विद्यमान लोकशाही स्वरूपाच्या भारतासारख्या बहुधार्मिक, संस्कृतिबहुल देशाची बौद्धिक गरज आहे. येथील विविध तऱ्हांच्या समस्यासार्वजनिकरित्या सोडविण्याच्या हेतूने अनेक विचारसरणीच्या अराजकीय, राजकीयआणि सामाजिक गटांमध्ये सुसंवाद होण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरणारी आहे.या पद्धतीचे अभ्यासपूर्ण विवेचन करणाऱ्या लेखाचा हा पहिला भाग. …

ही स्त्री कोण? (भाग-3) धर्म आणि बाईजात

‘धर्म आणि धर्मजात’ या शब्दप्रयोगात उघडपणे दोन शब्द किंवा संकल्पना आहेत, असे दिसते. पहिली धर्म आणि दुसरी बाईजात. आता शब्द दोनच असले तरी संकल्पना चार आहेत. धर्म, बाई आणि जात अशा मूळ तीन परस्पर भिन्न सट्या अलग करता येणाऱ्या संकल्पना आणि ‘बाईजात’ ही चौथी संमिश्र संकल्पना. बाईजात’ ही एकच एक संकल्पना नाही. तिच्यात बाई आणि …

ही स्त्री कोण? (भाग 2)

Women पासून Womanist आणि womanish रूपे आली. Womanish हा शब्द मुख्यतः अमेरिकन काळ्या माताकडून वयात आलेल्या पौगंडवयीन मुलींसाठी वापरला जाणारा बोलीभाषेतील शब्द आहे. पौगंडवयीन मुलींना पूर्ण स्त्रीत्वाकडे नेणारा या अर्थाने पण girlish च्या विरुद्ध अर्थी वापरला गेला. हा अर्थ घेऊनच feminism ही संज्ञा आणि संकल्पना रुळली, नवा वैचारिक प्रवाह अस्तित्वात आला आणि स्थिरावला. पण feminism …

ही स्त्री कोण? (भाग 1)

[ बाईचे बाईपण, तिचे भोग, दुःख ह्या सर्वांचे मूळ शोधण्याच्या उद्देशाने त्या अर्थाच्या मराठी, संस्कृत व इंग्रजी शब्दांच्या व्युत्पत्ती शोधण्याचा हा प्रयत्न. – संपादक ] माझं सुख माझं सुख हंड्या झुंबर टांगलं माझं दुःख माझं दुःख तळघरात कोंडलं – बहिणाबाई (1880-1951) स्त्री-पुरुष हे शब्द नेहमीच फारच सैलसर अर्थाने वापरले जातात. ते जरा नीटस अर्थाने वापरले …