श्री.बा.जोशी - लेख सूची

लेखकाचा अंगरखा

समाजसुधारक गोपाळराव आगरकर यांच्याकडे विद्यार्थिदशेत एकच सदरा असल्याने रोज रात्री धुऊन वाळत घालीत व दिवसा पेहरत. ही कथा अनेकांनी ऐकली असेल. अमेरिकन साहित्यिक एडगर अॅलन पो (ज्याने आधुनिक रहस्यकथा लेखनाचा पायंडा पाडला) आणि नॅथानियल हॉथॉर्न हे दोघे एकत्र राहत. दोघेही साहित्याच्या मस्तीत धुंद, परंतु खायला चण्या-कुरमुऱ्यांचेही वांधे. त्यांच्या साहित्यावर लुब्ध होऊन एका धनिक स्त्रीने त्यांना …