श्री. गो. काशीकर - लेख सूची

चर्चा- ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय आहे काय?

सामान्यतः विवेकवादी विचारवंत विश्वाच्या ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय नाही असे आग्रहाने प्रतिपादन करतात. परंतु टाइम्स ऑफ इंडियाच्या दि. ९ एप्रिल १९९५ च्या रविवार-पुरवणीत ‘सूक्ष्मवैश्विक क्रान्तदर्शने (Microcosmic visions) ह्या शीर्षकाखाली अनुराधा मुरलीधर यांनी जी माहिती दिली आहे ती त्यांना आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करायला लावील अशी आहे. मुरलीधर म्हणतात डॉ. अॅनी बीझंट व त्यांचे सहकारी सी. डब्ल्यू. लेडबीटर …

चर्चा – ‘धारणात् धर्म इत्याहुः।’ – दुसरी बाजू

‘आजचा सुधारक’च्या नोव्हें-डिसें. ९२ च्या अंकात ‘धारणात् धर्म इत्याहुः ।’ ह्या शीर्षकाखाली प्रा. मा.गो. वैद्य यांच्या पुस्तकातील ‘धर्म’ कल्पनेला विरोध करणारा प्रा. दि.य. देशपांडे यांचा लेख आला आहे. प्रा. वैद्य धर्म म्हणजे religion नव्हे असे म्हणतात, तर प्रा. देशपांडे यांचा आग्रहअसा की गेली दीडशे वर्षे धर्म म्हणजे religion हेच समीकरण अस्तित्वात आहे. इंग्रजी भाषेत ‘धर्म’ …