संपादक - लेख सूची

संपादकीय

आजचा सुधारक चा हा नवा अंक आपल्यासमोर सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. त्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्याची संधी मी घेत आहे. मराठीत नियतकालिकांची कमतरता नाही. त्यांपैकी वैचारिक नियतकालिकांची स्थिती मात्र गेल्या अनेक वर्षांपासून चिंताजनक म्हणावी अशी आहे व ती दिवसेंदिवस ढासळताना दिसते आहे. मुळात मराठी भाषेतील व्यवहारालाच ओहोटी लागली आहे. वैयक्तिक संवादापासून गहन …

तुमच्याशिवाय नाही

तत्त्वचर्चांची दृश्य रूपे कशी दिसतील? ती प्रतीकात्मकच असतील, की वास्तविक (realistic) असतील? बरे, तत्त्वचर्चा स्वभावानेच कोरड्या, नीरस. कला मात्र व्याख्येनेच रसाळ. मग तत्त्वचर्चांची दृश्य रूपे कधी कलात्मक होतील का? चर्चा मुळात शब्द हे माध्यम ओलांडून बाहेर, दृश्य रूपांत जाऊ शकतील का? साधारणपणे आपल्याला हे प्रश्न पडतही नाहीत, मग अस्वस्थपणे त्यांची उत्तरे शोधणे तर दूरचेच. पण …

सकारात्मक दृष्टीतून इतिहासलेखन

इतिहास लिहिण्याच्या पद्धतींमागच्या भूमिकांचा आढावा घेणारा रा.ह.तुपकरींचा लेख या अंकात आहे. त्यांच्या आगामी ग्रंथातील इतिहास या प्रकरणाचा तो संक्षेप आहे. इतिहासकार व त्याचा वर्तमानकाळ यांचा त्याने लिहिलेल्या इतिहासावर परिणाम होणारच. पण व्यक्तिसापेक्षता मान्य करूनही ते कल्पकतेतून लावलेला अर्थ आणि बुद्धिपुरस्सर केलेली मोडतोड…… (यांतील) सीमारेषा फार पुसट असतात, असा महत्त्वाचा इशारा देतात. कथाकथनात्मक, मार्क्सवादी, आधुनिकतावादी व …

संपादकीय नवे गडी, नवा राज!

आजचा सुधारक चालवण्याशी अनेकांचे, वेगवेगळ्या पातळ्यांवरचे, वेगवेगळ्या प्रकारचे संबंध असतात. वाचक/ग्राहक हा संबंधितांच्या संख्येने सर्वांत मोठा प्रकार. यांतही आजीव, दरवर्षी वर्गणी देणारे, परदेशस्थ, संस्थासदस्य, (ज्यांच्याशी आसुचे आदानप्रदान होते अशी) नियतकालिके, (ज्यांनी आसु वाचावा असे वाटल्याने अंक सप्रेम पाठवले जातात, असे) विचारवंत, इत्यादी प्रकार असतात. या सर्वांकडून येणारे प्रतिसाद, हा आसु चे धोरण ठरण्यातील एक महत्त्वाचा …

संपादकीय काळजी आणि उपाय

सोबत दोन नकाशे आहेत, भारतातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या पावसाच्या प्रमाणांचे. कच्छ-सौराष्ट्र भागातच पाऊस सरासरीच्या जास्त झाला आहे. उत्तरप्रदेशाचा पश्चिम भाग, हरियाणा, दिल्ली या क्षेत्रांत पाऊस सरासरीच्या चाळीस टक्क्यांनाही पोचलेला नाही. ओरिसा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, गोवा, केरळ व दक्षिण कर्नाटक या क्षेत्रांत पाऊस सामान्य आहे (म्हणजे सरासरीच्या १९% वरखाली). उत्तर कर्नाटक व तामिळनाडू मात्र सहाच दिवसांच्या पावसातल्या …

‘मी’ आणि ‘माझे

विवेकी स्वार्थ हा कार्लचा धर्म आहे. तो मुक्त बाजारपेठेच्या वेदीवर पूजा करतो. फ्रॉईड जसे सर्व काही सुरत (Sex) आहे, असे मानायचा, तसे कार्ल सर्व सामाजिक व्यवहार, मग ते कितीही व्यामिश्र असोत, सोडवायला त्यांवर किंमतीचे लेबल लावतो, नागरी गृहसमस्या, शिक्षण. स्पर्धा आणि नफ्याची आशाच सर्व प्रश्न सोडवू शकते. मोठी थिअरी आहे, ही. सर्वांना प्रवाहातून त्यांचे त्यांचे …

संपादकीय

मंदीची कहाणी The Grapes of Wrath आर्थिक मंदी म्हणजे एखाद्या समाजाने केलेली उत्पादने विकत घेण्याइतकी क्रयशक्ती लोकांकडे उपलब्ध नसणे. यातून बेकारी वाढते. लोकांची क्रयशक्ती आणखीनच घटते आणि मंदी अधिकच तीव्र होते. अशी एक महामंदी, द ग्रेट डिप्रेशन, १९२९-३९ या काळात अमेरिकेला त्रासून गेली. अमेरिकेला उत्पादने पुरवणाऱ्या देशांनाही याची झळ लागली. या काळाचे उत्कृष्ट वर्णन जॉन …

एक क्रान्तीः दोन वाद (भाग २)

[एक क्रान्तीः दोन वाद च्या पहिल्या भागात औद्योगिक क्रान्तीसोबत घडत गेलेल्या भांडवली उत्पादनव्यवस्थेच्या सुरुवातीच्या रूपाची ओळख आपण करून घेतली. अँडम स्मिथ, जेरेमी बेंथम, जॉन स्टुअर्ट मिल् यांच्या विचारांनुसार इंग्लंडात भांडवलवादी अर्थव्यवस्था कशी रुजली ते आपण पाहिले. आता त्यापुढे-] परदेशगमन!औद्योगिक क्रांतीनंतरच्या बदलाचा मागोवा घेताना वेगवेगळ्या प्रक्रियांच्या विकासाचे टप्पे ठरवताना काही अडचणी येतात. प्रत्येक भाष्यकार सोईनुसार टप्पे …

संपादकीय

एकोणीसशे पन्नास-साठच्या दशकात वादविवेचनमाला नावाची एक ग्रंथमाला काही घरांमध्ये दिसत असे. जॉर्ज बर्नार्ड शॉचे अॅन इंटेलिजंट वुमन्स गाईड टु कॅपिटॅलिझम, सोशलिझम एट् सेटरा (नेमके नाव जरा वेगळेही असेल!) हे पुस्तकही इंग्रजी वाचणाऱ्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात ओळखीचे असे. नंतर मात्र विनय हर्डीकरांच्या शब्दांत ‘सुमारांची सद्दी’ सुरू झाली. अभ्यास थांबला आणि अडाणी अतिसुलभीकरणे वापरात आली. कॅपिटॅलिझम म्हणजे मुक्त …

एक क्रान्तीःदोन वाद (भाग १) प्रस्तावनाः

इसवी अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत जगातील बहुतांश माणसे शेती व पशुपालन ह्यांवर जगत असत. त्यांच्या जीवनपद्धतीचे वर्णन अन्नोत्पादक असे केले जाते. त्यामागील राजकीय-आर्थिक-सामाजिक व्यवस्थेचे वर्णन सामंती , फ्यूडल (feudal) असे केले जाते. अठराव्या शतकाच्या मध्यावर मात्र एक नवी जीवनपद्धती उद्भवली. आधी इंग्लंडात उद्भवलेली ही पद्धत पुढे युरोप, अमेरिका, आशिया, आफ्रिका, अशी पसरत आज जगाच्या बहुतेक भागांपर्यंत …