भ्रष्टाचार आणि माहितीचा अधिकार
गरिबी व भ्रष्टाचाराचा घनिष्ठ संबंध आहे. भ्रष्टाचाराचा विपरीत परिणाम सर्वच समाजावर होतो पण सर्वांत जास्त फटका गरीब व वंचित घटकांना बसतो. त्यांचे मूलभूत हक्कच डावलले जातात. कारण सामान्य लोकांना प्राथमिक आरोग्य सेवा, शैक्षणिक सुविधा, रेशन, जमीन मालकीची कागदपत्रे मिळवण्यासाठी लाच द्यावी लागते. भारतातील बहुसंख्य लोकांना हे सहन करावे लागते. भारतातील जनमानसात भ्रष्टाचार खोलवर रुजलेला आहे. …