‘नवा सुधारक’ चा प्रकाशन समारंभ
दि. ३ एप्रिल १९९० रोजी प्रा. म. गं. नातू द्वितीय स्मृतिदिनी विदर्भ साहित्य संघ, नागपूर येथे ‘नवा सुधारक’ चे प्रकाशन न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, डॉ. य. दि. फडके यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगाचा वृत्तांत आणि प्रा. राम शेवाळकर, डॉ. य. दि. फडके आणि न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या भाषणांतील महत्त्वाचे अंश खाली देत आहोत. ‘नवा सुधारक’च्या …