मनोगत
हरिहर कुंभोजकर ह्यांचा ‘हिरण्यकश्यपूचे मिथक……’ हा लेख आणि निखिल जोशी ह्यांना त्या लेखात सापडलेल्या विसंगती हे दोन्ही ‘आजचा सुधारक’च्या जानेवारीच्या अंकात प्रकाशित झाले होते. “हे एकाच वेळी प्रकाशित झाले ह्याचा अर्थ निखिल जोशी ह्यांना मूळ लेख प्रसिद्धीपूर्वीच उपलब्ध झाला होता” अशी तक्रारवजा मांडणी हरिहर कुंभोजकर ह्यांनी त्यांच्या प्रतिवादात केली आहे. ही त्यांची तक्रार रास्तच आहे. …