अंधश्रद्धा आणि आदिवासी समुदाय
गेल्या वीस वर्षात महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी मोठी चळवळ झाली आहे, अंधश्रद्धेबद्दल महाराष्ट्रातील काही भागातील जनता जागरुकही झाली असेल. परंतु आजही काही आदिवासी समाजात कमालीची अंधश्रद्धा आहे. त्यापैकीच एक फासेपारधी समाज, या समाजामध्ये आजारपणात घरच्याघरी उपचार करण्याच्या अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. हा लेख लिहायच्या आठ दिवसांआधी माझ्या पुतणीचा कान एका रात्री अचानक खूप दुखायला लागला, आणि …