बाबा लगीन आणि नास्तिक्य – हरिहर कुंभोजकर ह्यांच्या लेखावरील प्रतिक्रिया
भारतात लग्न करण्यासाठी पुरुषांनी (अपवाद वगळता) किमान २१ वर्षांचे असणे गरजेचे आहे. २१ व्या वाढदिवशी मध्यरात्रीची घंटा वाजते आणि पुरुषांना लग्न करण्याचा अधिकार मिळतो. अर्थातच, २० वर्षे ३६४ दिवस एवढे वय असताना ते जेवढे ‘सज्ञान’ किंवा ‘प्रौढ’ असतात त्यापेक्षा २१ वर्षे वय झाल्यावर फार काही जास्त सज्ञान किंवा प्रौढ होतात असे काहीही नाही. तरीही कायदेशीर …