आमचे नाना
३१ डिसेंबर २००५ च्या पहाटे १.३० वाजता नानांनी या जगाचा निरोप घेतला. वय ८९ वर्षे! म्हटले तर पिकले पान ! खरे आहे. पण ते ज्या दिवशी गळून पडले तो दिवस तर इतर दिवसांसारखाच होता. सकाळचा चहा, जेवण, दुपारचा चहा, संध्याकाळचे थोडेसे खाणे इथवर तो रोजच्यासारखा होता आणि अचानक काय झाले कोणास ठाऊक? मी सभेवरून आले …