मनाचिये गुंती
आधुनिक युगात स्थलकालाबाधित अशी जर कोणती गोष्ट असेल, जी प्रत्येक मनुष्यप्राण्याला कमीजास्त प्रमाणांत छळत असते, ती म्हणजे काळजी किंवा चिंता. Anxiety (चिंता) हा जर एखाद्या व्यक्तीचा स्थायीभाव झाला तर, तिचे दूरगामी शारीरिक व मानसिक दुष्परिणाम, अनेक व्याधींचा उद्भव करून त्या व्यक्तीचे जीवन यातनामय कस्न टाकू शकतात. ‘जी चित्ताला जाळते ती चिंता’ हे सर्वश्रुत आहेच. सामान्य …