अणुऊर्जा अपघात भरपाई बिल २०१०
भोपाळ दुर्घटनेबद्दलच्या न्यायालय-निर्णयानंतर विरोधी पक्षांनी सिव्हिल लाकॅबिलिटी फॉर न्यूक्लीयर डॅमेज बिल २०१० च्या विरुद्ध रान उठवायला सुरुवात केली आहे. हे अणुऊर्जा अपघात नुकसान-भरपाई बिल सध्या सायन्स आणि टेक्नॉलॉजीवरील पार्लमेंटरी स्टैंडिंग कमिटीपुढे विचारात आहे. या बिलाबद्दल बऱ्याच गैरसमजुती आहेत, त्या अशा: १. रु.५०० कोटींची नुकसानभरपाईची मर्यादा फार तोकडी आहे. २. या बिलानुसार खराब सामुग्री देणाऱ्या परदेशी …