लग्नानंतर स्त्रीचे नाव बदलावे का?
‘लग्नानंतर स्त्रीचे नाव बदलावे का?’ हा मुळी कधी प्र नच उपस्थित झाला नाही. त्याचा स्त्रीच्या अस्मितेशी काही संबंध आहे अशी जाणीवही होऊ नये इतकी ती अंगवळणी पडलेली गोष्ट आहे. मग त्याचे वेगवेगळे कंगोरे बोचू लागणे ही गोष्ट दूरच! पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीने पुरुषाच्या अधीन राहावे ही समाज-मानसाने —- मग त्यात स्त्रियाही आल्याच —- पूर्णतः स्वीकारलेली गोष्ट …