सुलक्षणा महाजन - लेख सूची

आय डू व्हॉट आय डू

‘आय डू व्हॉट आय डू’ डॉ. रघुराम राजन यांचे आज गाजत असलेले पुस्तक. ते वाचून मला लिखाण करावेच लागले.’….मार्च २०१८ मला अर्थशास्त्रामध्ये कसा काय रस उत्पन्न झाला ते आठवत नाही. पण जॉन केनेथ गालब्रेथ यांची ‘इंडस्ट्रियल सोसायटी’, ‘पॉवर’ यांसारखी गाजलेली काही पुस्तके वाचल्यापासून तो विषय समजायला आणि म्हणून आवडायला लागला. नंतरही अनेक अर्थतज्ज्ञांची पुस्तके जेवढी …

भावनांच्या लाटांवर हिंदोळणारे काश्मीर

गेल्या काही दिवसातील वेगाने घडलेल्या घटना बघून लहानपणापासून सिनेमाच्या पडद्यावर बघितलेले काश्मीर सारखे आठवते आहे. प्रोफेसर, काश्मीर की कली, जंगली अशा लहानपणी बघितलेल्या अनेक हिंदी सिनेमांच्या आणि त्यातील काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याच्या, सुरेल गाण्यांच्या पार्श्वभूमीवर चित्रित केलेल्या दृश्यांच्या आणि इतर अनेक प्रसंगांच्या आठवणी जाग्या झाल्या. त्याकाळी काश्मीरमधल्या मुली मुस्लिम आहेत की हिंदू असा विचार चुकूनही मनात …

भरकटलेल्या अर्थव्यवस्थेचे दशक

भारतामधील निवडणुकीचा गदारोळ आता संपला आहे. निवडणुकीच्या वादळाने उडविलेला विखारी आणि अतिशय वैयक्तिक पातळीवर जाऊन केलेला प्रचाराचा, आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा खाली बसेल, भडकलेल्या भावना आणि तापलेले वातावरण आता थंड होऊ लागेल अशी आशा आहे. मागील दहा वर्षांत देशामध्ये घडलेले राजकीय स्थित्यंतर, या काळात देशाची आर्थिक प्रगति-अधोगती समजून घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे. राजकीय ध्रुवीकारण बाजूला ठेवून …

इकॉलॉजी आणि इकॉनॉमी

(जवळजवळचे वाटणारे आणि असणारे हे इकॉलॉजी आणि इकॉनॉमी (इंग्रजी) शब्द परस्परांपासून दुरावल्याची ‘आपत्ती’ ) इकॉनॉमी हा शब्द दोन ग्रीक शब्दांपासून बनला आहे. eco म्हणजे घर, परिसर आणि nomy म्हणजे व्यवस्थापन. या पार्श्वभूमीवर पृथ्वीचे, निसर्गाचे ज्ञान म्हणजे इकॉलॉजी आणि निसर्गाचे व्यवस्थापनशास्त्र म्हणजे इकॉनॉमी. या दोन्ही शब्दांचे जवळचे नाते ग्रीक भाषेत सहजपणो मांडले गेले आहे. इतकेच नाही …

परंपरांच्या विरोधात

[लिन् मालिस (Lynn Margulis) ही एक चाकोरीबाहेरच्या वाटा चालणारी जीवशास्त्रज्ञ आहे. कालेजच्या आयुष्याच्या सुरुवातीला तिचा कार्ल सगानशी प्रेमविवाह झाला. तो पुढे प्रख्यात विज्ञानप्रसारक झाला. पृथ्वी सोडून विश्वात कुठे बुद्धिमान जीव आहेत का, हे शोधण्याच्या SETI (Search for Extra-Terrestrial Intelligence) प्रकल्पाचा तो जनक. लिन् मात्र त्याच्याशी विभक्त होऊनही मैत्री टिकवून आपले संशोधन करत राहिली. तिच्या सिंबायॉटिक …

पैसा झाला मोठा !:

पुस्तक-परिचय सुलक्षणा महाजन पुस्तक-परिचयामागील भूमिका पैसा हा आपल्या आधुनिक जीवनाचा अतिशय महत्त्वाचा हिस्सा झाला आहे. आपले कोणतेही वैयक्तिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक व्यवहार हे आता पैशांच्या मदतीशिवाय करता येत नाहीत. अठरा-एकोणिसाव्या शतकात नाणी वा कागदी नोटांच्या स्वरूपातला पैसा आजच्याप्रमाणे सरसकट वापरात नव्हता. अनेक आर्थिक व्यवहार हे वस्तूंच्या प्रत्यक्ष देवाणघेवाणीतून केले जात. सोन्याचांदीची नाणी चलन …

संघटित भावना आणि नगरसंस्कृती (Collective Emotion and Urban Culture)

मुंबईमध्ये मराठी विरुद्ध बिगरमराठी आंदोलने होणे हे तसे नवीन नाही. राजकीय लाभासाठी काही तरी भावनात्मक निमित्त शोधण्याचे प्रयत्न राजकारणी करीत असतात आणि मुंबईसारखे महानगर ही त्यासाठी सुपीक भूमी असते. सर्व जगातील महानगरी समाजांमध्ये स्थानिक आणि भाषिक अस्मिता दिसतात आणि त्यांचा हिंसक उद्रेक काही ना काही निमित्ताने होत असतो. वैयक्तिक भावनांप्रमाणेच अनियंत्रित संघटित भावनांचा असा सामाजिक …

संपादकीय नागरीकरण: प्रक्रिया, समस्या आणि आव्हाने

गेल्या दशकात भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात महानगरे, नगरे आणि वाढणारी नागरी लोकसंख्या यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली. वर्तमानपत्रांमध्ये महाराष्ट्रातील अनेक नगरांबद्दल, (इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळाबद्दल) सातत्याने लिहिले गेले. त्या निमित्ताने अनेक नगरांचे प्राचीन काळापासूनचे अस्तित्वही अभिमानाने शोधले गेले. परंतु अशा लिखाणामध्ये नागरीकरणाच्या, मानवांची नगरे निर्माण करण्याच्या प्रक्रियेकडे मात्र क्वचितच लक्ष वेधले गेले. नगरे का निर्माण होतात? …

नागरी नियोजनाच्या मर्यादा

आधुनिक औद्यगिक आणि नागरी क्रांती हातात हात घालून युरोप-अमेरिकेत अवतरली. अठराव्या शतकात सुरू झालेले ग्रामीण लोकांचे नागरी स्थलांतर वेगवान झाले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये युरोप-अमेरिकेतील नागरी लोकसंख्येचे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षाही जास्त झाले. थोड्या दशकांमध्ये शहरांत लोटलेल्या या लोकसंख्येला मिळेल त्या जागी, मिळेल त्या स्थितीमध्ये, गर्दी-गोंधळाच्या अवस्थेत शहरांनी सामावून घेतले. १८४४ साली फ्रेडरिक एंगल्स याने मँचेस्टरमधील कष्टकऱ्यांच्या …

स्त्रीवैज्ञानिक आणि त्यांच्या संशोधनाचे सामाजिक आयाम

स्त्रीवैज्ञानिकांचा विचार करताना मी पाच आधुनिक स्त्री वैज्ञानिकांचा परिचय येथे करून देणार आहे. या पाच जणींनी तत्कालीन स्वीकृत सिद्धान्तांना छेद देणारे संशोधन केले. त्याचबरोबर त्यांच्या संशोधनातून प्रचलित, स्वीकृत सामाजिक व्यवहारांमध्ये आणि व्यवस्थांमध्ये ज्या मोठ्या उणिवा त्यांना आढळल्या त्यांच्यावर त्यांनी कठोर टीका केली. परिणामी या वैज्ञानिक संशोधनाचे सामाजिक मोल समाजाला मान्य करावे लागले. प्रचलित व्यवस्थांमध्ये सकारात्मक …