नीतिविचार
आधुनिकपूर्व काळातील नीतीचे स्वरूपसामान्य बोलचालीत (Common Parlance) नीती म्हणजे ढोबळमानाने व्यक्तीच्या समाजव्यवहारातील वर्तणुकीचे नियम किंवा धारणा (Social Judgements) होय. त्या त्या संस्कृतीमध्ये वर्तणुकीचे ठराविक संकेत असतात. त्यांना त्या त्या समाजाची केवळ मान्यताच असते असे नाही; तर तसे वागण्यासाठी व्यक्तीला प्रोत्साहन दिले जाते, आणि न वागण्याबद्दल तिच्या वाट्याला निंदा येते. या संकेतांचा उगम रूढी, परंपरा, प्रथा …