एक लक्षवेधी संपादकीय
मार्च २००० चा आजचा सुधारक वाचला. प्र. ब. कुळकर्णी यांच्या चिंतनातून उतरलेले संपादकीय मननीय आणि विचारप्रवर्तक आहे. आतापर्यंत आ. सु. तील विवेकवादी विचारांचा मार्ग धुक्यात हरविल्यासारखा मला अस्पष्ट होता. प्र. व. ह्यांच्या संपादकीयातून विवेकवादी विचारसरणीला जे अपेक्षित आहे ते सुस्पष्ट झाले आहे. आजच्या सुधारकाने जी वैचारिक भूमिका घेतली आहे ती कर्मठांना आणि परंपरावाद्यांना मस्तकशूळ उत्पन्न …