कीर्ती पाटसकर - लेख सूची

डिस्‌इन्फेक्टन्ट

कुठे मिळेल एखादामहारेरा रजिस्टर्डमनाचा शांत कोपरा,आठवणींची पथारी पसरायला? अस्वस्थतेच्या काहिलीलाकुठे बसवून मिळेलफाईव्ह स्टार इन्व्हर्टर एसी?तितकाच गारवा वर्तमानाचा…! कुठल्या वॉर्डमध्ये होतीलभीतीचे भुंगे सॅनिटाईज?कुठल्या औषधात हीगढूळ संध्याकाळ घालून प्यायलीकी गोड लागेल? विवंचना, काळजी इत्यादींचेमास्क कोणत्यामेडिकलमध्ये मिळतील? सकारात्मकतेचे सर्जिकल ग्लोव्ह्सघालून झोपले तरनाकातोंडात जाणारी रात्रजरा कमी होईल का माझी? …माझं हे हल्ली असंच होतंयकळत नाही नक्की काय डिसीनफेक्टन्ट करायचंय …