केशव सखाराम देशमुख - लेख सूची

वात्सल्याचे तपशील

एकदा पाणभिजला ऋतु येऊन गेला म्हणजे शिवारावर श्वासांची लागवड सुरू होते पाखरे ओठांच्या काठांवर झाडांची हिरवी पाने ठेवतात पाखरांकडून खुलेपणाने कोरसपमध्ये सूर्याचे गाणे गायिले जाते सगळा आसमंत गणगोत होऊन माणसांच्या भेटीला येतो वासरांच्या वात्सल्याचे तपशील गायींच्या डोळ्यांत; डोळाभर झालेले असतात एवढेच शील : झाडांचे, शिवारांचे, पाखरांचे.