डॉ. राहुल खिल्लारे - लेख सूची

तू हसत रहा….

तू हसत रहाक्रांतीच्या विचारांवर मी पेटवत जातोएक एक रान  तू ओढत जा तुझ्या कुजल्या विचारांची एक एक रेघ आडवी नवनिर्माणाच्या स्वच्छ फळ्यावर मी पुसत जातो ती हर एक रेघ आडवी तू बोल छाती फुगवून आम्ही करोडोंमध्ये आहोत मी ढोल लावून एक एक जमवीत जाईन तू करत जा चर्चा आमच्यावरील खोट्या आरोपांची मी चिरत जाईन तुझ्या  वाफाळ शब्दांच्या तुफानी वादळांना  तू फवारत जा विष फुटीरतेचं मी सावरत जातो पडत चाललेल्या प्रत्येक  खिंडारीला तू …

तीन कविता

१. तुला डॉलच बनून रहायचे असेल तर  तुला डॉलच बनून रहायचे असेल तर पाठवत राहा शुभेच्छा महिला दिनाच्या.. बस कुरवाळत तुझ्या सहनशीलतेच्या दागिन्याला  तसेच, आयुष्यभर पुन्हा सहन करण्यासाठी… करत रहा अभिमान तुझ्या स्वत्वाच्या त्यागाचा  दिवसाढवळ्या पाहिलेल्या स्वप्नालागुलाबी रंगाचा डोहात बुडवून मारण्यासाठी …भरत रहा ऊर  ‘कशी तारेवरची कसरत करते’ हे ऐकून तुझ्या मनावर कोरलेल्या भूमिकेला न्याय देत घराचा ‘तोल’ तुझ्या मूकपणाच्या पायावर सांभाळण्यासाठी… टाकत राहा मनगटात बांगड्यांचे थर नेसत राहा नवरात्रीच्या नऊ साड्या करत रहा मेंदूला गहाण …