मंगला सामंत - लेख सूची

विवाहाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’!

अलीकडे एक चर्चा अचानक उफाळून आली, ती अशी की, विवाह अंतर्गत पतीची शरीरसंबंधाबाबत असणारी पत्नीवरची जबरदस्ती हा ‘बलात्कार’ समजायचा का? मात्र पतीच्या या जबरदस्तीच्या मुद्दय़ावर बोलण्यापूर्वी, पहिल्या प्रथम विवाहाविषयी थोडं प्राथमिक जाणून घ्यायला हवं. स्त्री-पुरुषांना एकमेकांच्या साथीने आणि पुढे आधाराने सहजीवन जगता यावे, म्हणून तरुणपणातच त्यासाठी जी निष्ठेची आणि प्रेमाची बैठक घातली जाते, तिला ‘लग्न’ …

लैंगिक धर्म — व्यक्त आणि अव्यक्त

[सातत्याने घडणारे लैंगिक गुन्हे ही आपल्या समाजातील तीव्र समस्या बनली आहे. दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर हे वास्तव अधिकच विदारकपणे आपल्यासमोर आले. त्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र गेल्या वर्षांत अशा गुन्ह्यांची वा प्रसारमाध्यमांनी दखल घेतलेल्या गुन्ह्यांची संख्या कमी न होता वाढली आहे. दिल्लीतील पीडित युवतीने अत्यंत धीराने व कणखरपणे त्या प्रसंगाच्या परिणामांना …