मोहन खामगांवकर - लेख सूची

रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्रविभाग : दशा व दिशा

प्रास्ताविक: M.B.B.S.च्या अभ्यासक्रमात रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र नावाचा विषय आहे. याच विषयाला इंग्रजीमध्ये प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडीसीन असेही संबोधण्यात येते. दंतवैद्यक, होमिओपॅथी, आयुर्वेद, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, सार्वजनिक आरोग्य परिचारिका पदवी व पदविका अभ्यासक्रम ह्यांसारख्या वैद्यक व पूरक अभ्यासक्रमातही हा विषय समाविष्ट करण्यात आलेला आहे. समाजशास्त्र, गृहशास्त्र, आहारशास्त्र, पोषणशास्त्र, रुग्णालय व सार्वजनिक आरोग्य-प्रशासन, व्यवसाय-आरोग्य, आरोग्य-शिक्षण अभ्यासक्रम, आरोग्य-कर्मचारी-अभ्यासक्रम, …