पत्रसंवाद

पत्रसंवाद
कृ.अ.शारंगपाणी, ३९१, शिवाजीनगर, पुणे ४११ ००४.
पूर्वी साहित्यिक विश्राम बेडेकरांच्या ‘सिलिसबर्गची पत्रे’ या पुस्तकात ‘ब्रहा म्हणजे सीमातीत केवळ जागृती’ असे वाक्य वाचले होते. परंतु ते काय सांगत आहेत, हे कळले नव्हते. आता आपल्या ऑगस्टच्या अंकात प्रसन्न देवदत्त दाभोलकर “मी आहे आणि माझे अनुभव आहेत.’ हा व्यक्तिगत अनुभव ज्यामुळे शक्य होतो ते चैतन्यस्वरूप ब्रह्म, असे सांगतात. हेही कळले नाही. कृपया मार्गदर्शन करावे. चैतन्यस्वरूप नसणारे ब्रह्मही असते काय, हेही कळवावे. म.ना.गोगटे, .पसेसरींश.लो साहित्य संमेलन ….पत्रक ऑगस्ट २००९
नमस्कार ! मराठी साहित्य संमेलनाने मराठी विज्ञान संमेलनास प्रेरणा दिली. पहा (www.mngogate.com) मधील मराठी लेख च०३ व इंग्रजी लेख ए०६. त्यामुळे अलीकडे साहित्य संमेलनात काही त्रुटी आल्या आहेत त्याचा मला खेद वाटतो. साहित्य व साहित्य संमेलने यांच्या प्रगतीस प्रकाशनसंस्था आणि प्रसारमाध्यमे यांचे महत्त्वाचे योगदान असते. पण संमेलनात त्यांची उपेक्षा होते, हे ठीक नाही. साहित्यकार्य कमी, मनोरंजन जास्ती (नाटिका, नकला, गाणी इ.) असे होऊ शकते. साहित्यिकाची मुलाखत न देता एका सामाजिक कार्यकर्त्यांची मुलाखत घेतात. (समाजसेवक, अर्थतज्ज्ञ इत्यादीसाठी अन्य व्यासपीठे आहेत). अध्यक्षीय निवडणुकीत वाद होतात. जनतेच्या करातून जमा झालेले भरघोस शासकीय अनुदान साहित्यसंमेलनास मिळते. त्याचा विनियोग जाहीर होत नाही. अन्यही मुद्दे असतील. तूर्त पुढे एक सूचना.
विविध साहित्यसंस्थांना संमेलनाध्यक्ष निवडणुकीस विशिष्ट मतदारसंख्येचा कोटा दिला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) यांनी मला एक मतदार नेमले होते. माझे वय ७७ आहे. म्हणून मी राजीनामा दिला आहे. काही पत्रकार व प्रकाशक यांना मतदारयादीमध्ये सामील करावे. (अन्य साहित्य संस्थानी देखील तसे करावे.) प्रत्येक संस्थेने मतदारांच्या वार्षिक एकदोन सभा चर्चेसाठी घ्याव्यात म्हणजे सुसंवाद व सुनिर्णय होतील. विचार करावा. उत्तर अपेक्षित नाही.
रुक्मिणी पुरस्कारासाठी शिफारशींचे सामाजिक संस्थांना आवाहन नाशिकः यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे निरनिराळ्या क्षेत्रांत कर्तृत्व गाजवणाऱ्या स्त्रियांना दरवर्षी ‘रुक्मिणी पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाते. या पुरस्कारासाठी कर्तृत्ववान स्त्रियांच्या नावाची शिफारस करण्याचे आवाहन मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहि:शाल शिक्षण सेवा केंद्राचे संचालक प्रा. डॉ. प्रमोद बियाणी यांनी केले आहे.
कृषि व ग्रामीण विकास, पर्यावरण, समाजसेवा, महिला व बालकल्याण, कला, क्रीडा, शिक्षण, पत्रकारिता, प्रशासन, आरोग्य या क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या महिलेस हा पुरस्कार दिला जातो. रोख अकरा हजार रुपये, स्मृतिचिह्न व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
बाबूराव बागूल गौरव पुरस्कारासाठी कथासंग्रह पाठविण्याचे आवाहन नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दरवर्षी नवोदित कथाकारांच्या पहिल्याच कथासंग्रहास ‘ज्येष्ठ साहित्यिक बाबूराव बागूल गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. या पुरस्कार निवडीसाठी नवोदितांनी आपले कथासंग्रह पाठविण्याचे आवाहन मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहि:शाल शिक्षण सेवा केंद्राचे संचालक प्रा. डॉ. प्रमोद बियाणी यांनी केले
आहे.
संपर्क पत्ता: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
‘ज्ञानगंगोत्री’, गंगापूर धरणाजवळ, नाशिक – ४२२ २२२.