पत्र-पत्रोत्तरे

धर्म-ग्रंथ कालनिरपेक्ष व कालातीत नाहीत!
२०१३ जानेवारी महिन्याचा ‘आजचा सुधारक माझ्या हातात आला. ह्यातील उत्पल व.रा. च्या कवितेत शेवटच्या कडव्यात ‘तरी व्यापून उरावी, संवेदना…..’ म्हटले आहे. कवितेतले फारसे काही मला कळत नाही. पण, ‘संवेदना व्यापून उरावी’ एवढे मात्र कळू शकले आहे. पण, श्री मधुकर कांबळे यांचा ‘भगवद्गीतेचे भारतात पुनरुज्जीवन’ हा लेख वाचल्यामुळे त्यातल्या भाव-भावनांचा मी विचार करू लागलो. अर्थात, श्री मधुकर कांबळे यांच्य या लेखावर अनुकूल-प्रतिकूल प्रतिक्रिया देण्याच्या मनःस्थितीत मी यावेळी नाही. फक्त जो विचार मला सुचला वा स्फुरला तेवढाच या ठिकाणी देण्याचा विचार केला आहे.

धर्म कशाला म्हणायचे असते, हे कोणत्याही धर्म-ग्रंथातून कळण्याची शक्यता तशी फारच कमी असते. ‘गीता’ हा धर्मग्रंथच मानायचा किंवा आणखी काही, दृष्टीने महत्त्वाचे नाही. पण, यातून जो ‘स्वधर्म’ प्रतिपादिलेला आहे. तेवढे लक्षात घेणे मात्र गरजेचे वाटते. ‘धर्म’ हा शब्द भारतीय जीवनदर्शनातून मूलतः आलेला आहे. याला इंग्रजीत ‘रिलिजन’ म्हटले जाते. पण, ‘रिलिजन’ या अर्थाने याकडे पाहिले जाऊ नये कारण, इंग्रजीत ‘रिलिजन’चा अर्थ ‘धर्म-संप्रदाय’ असाच केला गेला आहे. तेव्हा, ‘धर्म’ हा केवळ धर्म-ग्रंथांनी प्रतिपादिलेला आहे. म्हणूनच स्वीकारायचा नसतो. कारण, धर्म- ग्रंथासह कोणीही ‘स्वधर्म’ सुस्पष्ट प्रतिपादिलेला नाही व नसतो! या दिशेने विचार केल्यास लक्षात येईल की, ‘स्वधर्मात भला मृत्यु परधर्म भयावह’ हे विनोबाच्या गीताईमधले वचन स्वधर्माच्या वाटचालीतल्या मार्गावर प्रकाशझोत टाकते.

श्री. मधुकर कांबळे यांनी त्यांच्या लेखात आद्य शंकराचार्य, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींच्या (धर्म) मतांना उजाळा देऊन ‘गीता’ या हिन्दु धर्माने मान्य केल्या गेलेल्या धर्म-ग्रंथावर विवेचन केलेले आहे. पण, विनोबांच्या धर्मविषयक प्रतिपादनाकडे पाहिलेले लेखात तरी दिसत नाही. ते त्यांनी पहायला हवे होते. कारण, विनोबा ग्रंथप्रामाण्य मानणाऱ्यापैकी नव्हते. धर्म-ग्रंथ म्हणवल्या गेलेल्या ग्रंथांमधला सारच तेवढा त्यांना ग्रहण करता आला व महत्त्वाचाही वाटला. म्हणून त्यांनी जगातल्या बहुतेक सर्वच धर्म-ग्रंथांमधला सार काढून संक्षेपलेले सारग्रंथ रचलेले आहेत. म्हणून, कोणत्याही धर्म-ग्रंथांच्या पसाऱ्याकडे ते आकर्षिले गेले नाहीत. तेव्हा या ठिकाणी सांगायचे ते एवढेच की, कालसापेक्ष जे असते व आहे त्याला कालनिरपेक्ष वा कालातीत म्हणता येत नाही व म्हणूही नये! म्हणून, कोणताही धर्म-ग्रंथ कालातीत नाही व नसतो. यामुळे अशा ग्रंथातला युगानुरूप सारच. तेवढा घ्यायचाही असतो! बाकीचा पसारा टाकायचा नाही पण सोडायचा असतो. यातूनच ‘स्वधर्म’ विकसित होतो व होत आलाही आहे. कालक्रमणेतून अशीही परिस्थिती निर्माण होऊ शकते की, कोणतेही धर्म-ग्रंथ कालनिरपेक्ष वा कालातीत नसल्यामुळे कालांतराने उपयोगी वाटणारच नाहीत. म्हणून, अशा विकासशील प्रक्रियेतूनच मानवी जीवन घडत आलेले आहे व यातूनच वैश्विकता घडत आलेलीही आहे!

कोणाला आवडेल, रुचेल व पटेल याचा काही एक विचार न करता सहज वाटले व सुचले म्हणून या ठिकाणी धैर्यपूर्वक प्रतिपादिलेले आहे एवढेच!

बाबूराव चंदावार, सईनगर 2, डी-1, फ्लॅट-13, सिंहगड रोड, पुणे – 411030

आपण भारतीय असे का?
याचे उत्तर ‘गेम थिअरी’ वापरून श्री. रघुनाथन् (पुस्तकपरिचय-संजीवनी कुळकर्णी आ.सु. जाने.- 2013) यांनी दिले आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर फक्त भारतीयच नाही, तर सर्व माणसे हिशेबीपणाने वागतात. कसे वागल्याने फायदा होईल, कसे वागल्याने तोटा होईल, याचा विचार करून माणसे वागतात. तसे वागताना बऱ्याच वेळा आपला जन्मदत्त (जीनदत्त) स्वभाव आणि झालेले संस्कार यांच्यावर ती माणसे मात करतात. 

भारतामध्ये सध्या चांगले वागल्याबद्दल शिक्षा-काही वेळा जिवावर बेतणारी शिक्षा – होऊ शकते. आणि वाईट वर्तनाबद्दल बक्षीसच मिळते किंवा निदानपक्षी शिक्षा तरी होत नाही. म्हणजे दुर्वर्तनाला उत्तेजन मिळते. सद्वर्तनाला नाही. म्हणून आही भारतीय ‘असे’ वागतो – भारतामध्ये. पण जेथे (उदा. उत्तर अमेरिकेत) परिस्थिती याच्या उलट आहे, तेथे आम्ही ‘नीट’ वागतो. हा हिशेबीपणा म्हणजेच ‘गेम थिअरी’.

लेखकाने सुचविलेला ‘स्वधर्म जागृत ठेवण्याचा मार्ग’ मात्र निरुपयोगी आहे. कारण हिशेबीपणा स्वधर्माला ‘झोपवू’ शकतो किंवा जागवू शकतो ते ‘स्वधर्म’ पाळण्याचे फायदा होणार का तोटा होणार यावर अवलंबून असते. होणारा फायदा किंवा तोटा ताबडतोबीच्या आणि तात्पुरता असणार की उशीरा मिळणारा पण दीर्घकाळ टिकणारा असणार याचा विाचर करणारी पण माणसे असतात. उशिरा मिळणाऱ्या फायद्यासाठी, थांबण्याची किंवा तात्पुरता तोटा सहन करण्याची वृत्ती माणसामध्ये दिसून येते. ही वृत्ती जन्मदत्त असते, आणि शिक्षणाने – संस्कारांनी त्यात फारसा बदल होत नाही.

‘स्वधर्माचे’ अत्यंत निष्ठेने पालन करणाऱ्यांचेही दोन प्रकार असतात. एक अर्जुनाची डोळस निष्ठा – की जी आपण स्वधर्माचे पालन केल्यामुले त्याचा आपल्या नातलगांवर, समष्टीवर काय परिणाम होईल याचा विचार करून मग प्रत्यक्ष काय करणारी, तर दुसरी श्रीकृष्णाने उपदेशिलेली – परिणामांची तमा – बाळगता, फलाची चांगली-वाईट आशा आणि जबाबदारी न स्वीकारता, आपण फक निमित्तमात्र आहोत, असे समजून परिणामांची जबाबदारी ईश्वरावर सोपवणारी, आंधळी निष्ठा. ते काहीही असले, तरी अशी अत्यंत निष्ठेने ‘स्वधर्मा’चे पाळन करणारी माणसे समाजात अत्यंत अल्पसख्य असतात, आणि एरवी ती समाजावर आणि इतिहासावर नगण्य परिणाम घडवतात. पण हीच मंडळी जर सत्तेवर बसली तर मात्र प्रचंड हत्याकांडे, वंश-निर्मूलन वगैरे तरी घडवून आणतात, नाहीतर समाजामध्ये चांगला बदल अल्पावधीत घडवून तरी आणतात. अर्जुनासारखी (गीता ऐकण्यापूर्वीचा अर्जुन) माणसे स्वधर्माऐवजी सुधर्माचा स्वीकार करतात.

राज्यकर्ते लुटारू असले, आणि अशी निष्ठेने सुधर्म पाळणारी मंडळी मध्यम पातळीवर (प्रशासकीय नोकरशाही – ब्युरोक्रॅट्स, पोलिस खाते, सी.बी.आय., वगैरेंमध्ये) असली तर काय होते? तर या मंडळींची निरुपद्रवी पदांवर बदली होते, किंवा ते फारच उपद्रवी ठरले तर त्यांचे खून होतात!

आपण सर्व विचारांती याच निष्कर्षापर्यंत पोचतो :- आपण स्वधर्म/सुधर्म जागृत असलेल्या व्यक्ती बहुसंख्येने समाजात निर्माण करू शकत नाही. मग आपण काय करू शकतो?

आपण सुधर्माने वागल्यास बक्षीस मिळेल आणि वाईट वागल्यास शिक्षा मिळेल अशी व्यवस्था निर्माण करू शकतो. ते जरी अवघड असले, तरी अशक्य नाही. बऱ्याच पाश्चात्त्य देशांनी तशी व्यवस्था निर्माण करून दाखवली आहे. ही व्यवस्था कशी निर्माण करायची हेदेखील माहीत आहे – वाईट कायदे रद्द करणे, चांगले कायदे करणे आणि त्या कायद्यांची चांगली (झिरो टॉलरन्स) अंमलबजावणी करणे.

लुटारू राज्यकर्ते असलेल्या देशात असा व्यवस्था-बदल करणे अशक्य आहे. राज्यकर्ते असलेल्या व्यक्तींचा ‘लुटारू स्वभाव’ बदलणे अशक्य आहे. एकच आशा आहे – पुढील निवडणुकांमध्ये सुधर्मी लोकांना निवडणुकीस निदान उभे रहावे, असे वाटेल, अशी निवडणूक पद्धतीत सुधारणा करणे. सुधर्मी व्यक्ती जर निवडणुकीच्या रिंगणातच उतरल्या नाहीत, तर राज्यकर्ते कायमच लुटारू राहतील, व्यवस्थादेखील सध्याचीच राहील, आणि आम्ही भारतीय ‘असे’च राहू!

आपल्या निवडणुका पैशाच्या आणि गुन्हेगारीच्या प्रभावापासून मुक्त करणे हा एकच मार्ग आहे. मग ‘सुधर्मी’ व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात तरी उतरतील, मग कदाचित् त्या पुरेशा संख्येने निवडून येऊन राज्यकर्त्या बनतील, मग, कदाचित् व्यवस्थाबदल होईल. मग मात्र ‘गेम थिअरी’प्रमाणे आपण भारतीय ‘असे’ न राहता ‘तसे’ होऊ – कदाचित् नाही, नक्कीच होऊ!

पण तोपर्यंत, सुधर्मी लोकांनी येथे तडफडत आणि चरफडत बसण्यापेक्षा ‘डेव्हलप्ड’ देशांचे नागरिकत्व मिळवून देशांतर करावे व सुखात जगावे – ‘अॅटलास श्रग्ड’ या कादंबरीत प्रतिपादन केल्याप्रमाणे.

सुभाष आठले, 25, नागाळा पार्क, कोल्हापूर (भ्र.ध्व.: 9420776247)

मासिकाचे ऑक्टोबर 2012 व नोव्हेंबर 2012 चे अंक वाचनालयात वाचण्यास मिळाले. अंक वैशिष्ट्यपूर्ण आहेत असे वाटले. म्हणून कांही लेखांविषयी थोडी मते मांडीत आहे.

शेतकऱ्यांच्या समस्या या संबंधात तीन जणांनी लिहिले आहे.
1) श्री. दिवाकर मोहनी
2) श्री. मोरेश्वर वड्लकोंडवार
3) श्री अमर हबीब.

हा प्रश्न फक्त शेतकऱ्यांपुरताच मर्यादित नाही. हा खरोखरी संपूर्ण ग्रामीण व शहरी व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. आणि त्याचा सुटासुटा विचार करता येणार नाही. मूळ समस्या वेगाने वाढत आलेली लोकसंख्या आहे. पूर्वीसुद्धा शेतीला फक्त शेतीवर अवलंबून असलेली संख्यासुद्धा जड होती. आता ती फारच कठीण झाली आहे. पूर्वी ज्यांच्याकडे 50 एकर (1947) शेती होती, त्यांच्या वारसांकडे आता 5 एकर असते. त्यामुळे holding power जवळजवळ नाहींच. ही वरकड पावसावर अवलंबून असते, त्यामुळें कमी/जास्त पाउस, तसेच पिकांवर येणारी कीड, खराब लागलेली बियाणे इत्यादि अनेक गोष्टी ह्या शेतीला सदैव त्रासदायक ठरतात व शेतकऱ्यांना असहाय्य करतात. त्यामुळे शेतकऱ्यांची थोडीफार शिकलेली मुले ही गोष्ट मनांतून ओळखून असतात व त्यामुळे त्यांचा ओढा शहराकडेच राहणार. त्यांना शेतीच्या नवीन पद्धती, ठिबक सिंचन, शेततळी वगैरे गोष्टींमधे रस नसतो. त्यातून सरकारी धोरणे ही सगळ्यात भर घालीत असतात. श्री. मो. व. व श्री. अमर ह. यांनी या गोष्टी पुढे मांडल्याच आहेत. हल्ली शेतमजूर होणे हे जास्त कमी कष्टाचे, व कमी जबाबदारीचे काम ठरते. सरकारी धोरणांमुळे स्वस्तात धान्य मिळते. रोजगार हमी योजनेत पैसे पण जास्त मिळतात (त्यामुळेच श्री शरद पवारांनी शेतीच्याकामाच्या दिवसांत रो.ह.यो. नको असे मत मांडले होते). आता food security Act खाली कावकाव होते ते बघायचे.

शेतीला अवजड झालेली लोकसंख्येला उपजीविका द्यायची असल्यास उद्योगधंद्यांकडेच तिला वळवावे लागणार म्हणजे manufacturing industry ला अव्वल स्थान देणे जरूरीचे आहे. ते शहरामध्येच किंवा शहरांच्या नजीकच्या भागातच शक्य होणार. त्यामुळे शहराच्या सुयोग्य वाढीकडे व नियंत्रणे यात्री विशेषेकरून लक्ष देण्याची प्राथमिकता आहे. उद्योगधंदे यांची वाढ crystallization पद्धतीने होत असते. एक घंटा येतो – पाठोपाठ दुसरा संबंधित/अवलंबित असलेला येतो. मोठे उद्योग काढताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. कच्चा मालाची उपलब्धता, market ची अंतरे, दळण-वळणाची व्यवस्था, शिक्षण व आरोग्यसेवा यांची उपलब्धता, पाणी व वीज किती व काय दराने मिळेल व त्याची खात्री अशा अवेळ बाबी असतात. (आज लोक सांगत आहेत की मराठवाड्यात अनेक उद्योग पाणी नसल्याने बंद होत आहेत). उद्योगधंदेच या देशाला तारणार आहेत हे लक्षात ठेवणे जरुरीचे आहे. सगळे उद्योगधंदे फक्त माळरानावर किंवा deserts मध्ये काढावेत असा गळा तथाकथित पुरोगामी NGOs, तसेच विचारवंत असा आक्रोश करतात तो सर्वथा गैरलागू आहे. भांडवलशाहीच्या नावाने आपण किती दिवस गळा काढणार आहोत हे कळत नाही.

SEZ कल्पना चांगली होती. तिच्यात त्रुटी होत्या व त्या दूर करण्याकडे प्रयत्न होणे जरूर होते. पण शेतकरी नागवला जात आहे. हीच फक्त ओरड उच्च व अतिउच्च स्वरात घोषित होत होती. हिंदुस्थानमध्ये SEZ च्या माध्यमातून शेतीपैकी फक्त 2 ते 3% जमीन जाणार होती. एक ठोकरवर असलेली industry 30 ते 50 लोकांना रोजगा देऊ शकते हे लक्षांत ठेवणें जरूरीचें आहे. आता नवीन कायद्याप्रमाणें मोठी industry चालू करणे कितपत सुखद ठरणार आहे हे कुणास ठाउक. समजा 1000 एकर सल जमीन पाहिजे असायास 5 एकरांच्या 200 x 0-8 = 160 मालक व त्यांचे सज्ञा वारस (पत्नी पण असावी) यांची संमती जरुर ठरणार. हे किती वेळ खाणार क industry च माघार होणार हे कळत नाही.

शहरे अगदी अव्यवस्थित पद्धतीने वाढत आहेत. बहुतेक ठिकाणी पाण्याच अपव्यय होत राहणार. जरूरीपेक्षां पाणी ती वापरत आहेत. खरोखर पिण्याचे पाणी बाकीचे वापराचे पाणी याचे विभाजन केले पाहिजे. वापरामधून निर्माण होणारे सांडपाण collect करून ते freat करून व त्यात कांहीं थोडे ताजे पाणी मिसळून पुन्हां ते वापरत येईल. याकरितां मोठ्या शहरात स्वतंत्र वेगवेगळ्या वाहिन्या लागतील. छोट्या शहरां तर पिण्यो पाणी मोठ्या containers मधूनसुद्धां पुरवता येईल. हे सर्व खर्चिक आहे प शेवटी अनिवार्य होणारच आहे. पण शेवटी नागरिकांनी हा भार उचलला पहिजे. सगळ्यांन सगळ्या गोषअटी अतिशय स्वस्तांत, खरे तर फुकटच. पाहिजे आहेत. हे उद्योगांनासुद लागू आहे. त्यांनाही याच पद्धतीनें पाणीपुरवठा केला पाहिजे.

वीज प्रकल्पांना सदैव विरोध होत आहे. मग तो Thermal असो की nuclear असो. वीज तर पाहिजे, पण प्रकल्पांना विरोध कुठले न् कुठले कारण काढून. Nothing is perfect, we must accept there would be some disadramtages ar कांहींच पुढे सरकत नाही. पवनशक्ती या देशाला वीज पुरवू शकणार नाही (तिलाही विरोध आहेत). Solar Power अजून बाल्यावस्थेत आहे. या वेळेस या शक्ती वापरण्याची शक्यता निर्माण होईल त्या वेळेस ते आपोआपच अमलात येईल.

श्री. मोहनी commune चा पर्याय सुचवतात. आधीच खेड्यात श्रीमंत-गरीब, वरिष्ठ जाती, कनिष्ठ जाती, राजकीय पक्ष-उपपक्ष, भाउबदली असे उभे-आडवे-तिडवे भेद आहेत. जिथे समजूतदारपणाचा अभाव आहे. तिथे commune कशी काम करतील? तिथे तयार होणारे उत्पन्न वाढून घेताना कलह होणार नाहीत का? ते जमीनमालक खंडाने जमीन देतात, त्याची सोय काय? त्यांची संमती जरूर आहे की नाही? त्यांचे वारस यांची position काय असेल? असे अनेक प्रश्न आहेत. प्रत्येक ठिकाणी Problem always lies in details $& they become critical. अनेक प्रश्न कायद्यांनी सुटत नाहींत, तर कधी कधी निर्माण होतात. मुलींना वडिलार्जित मालमत्तेत हक्क देण्याचा कायदा घ्या. एक शेतकरी आहे. 10 एकरांचा मालक आहे. वडिलार्जित जमीन आहे. तीन मुली व मुलगा आहे. मुलींची लग्ने होऊन सुखाने नांदत आहेत. त्यानंतर 20 वर्षे मुलगा कष्ट करत आहे (बाप दिवसेंदिवस वृद्ध होत आहे) त्यानें जमिनीचा कस वाढवला आहे. जमीन समतल केली आहे. शेततळे/विहीर करून थोड्याफार प्रमाणांत सिंचनाची सोय केली आहे. त्यामुळें जमिनीची किंमत वाढली आहे. बाप गेला. आता मुलींना सारखा वाटा देणे योग्य (न्याय्य) ठरेल काय? मुलग्याच्या अतिरिक्त श्रमांची किंमत (valuation) कशी ठरवायची हा प्रश्न ती ती मंडळी समजूतदारपणाने सोडवू शकतात. इथे कायदा काढला की भांडण/वैर यांना सुरवात होणार.

4) विज्ञान, तंत्रज्ञान व गांधीजी – श्री. रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ

लेख गांधीजींची भूमिका ऐतिहासिक दृष्टिकोनांतून समजून घ्यायला योग्य आहे. प्रश्न तंत्रज्ञान-विज्ञानाचा आहे. जे तंत्रज्ञान-विज्ञान सिंगर मशीन बनवायला उपयोगी, तेच विज्ञान-तंत्रज्ञान प्रचंड यंत्रे, विमाने आणि बाण वगैरे वगैरे बनवते. तेव्हां कुठे थांबायचें हे कुणी कसे ठरवायचें? Nothing can stop the mach of technology; choice is yours. रुसो, टॉलस्टाय्, थोरो, गांधीजी, विनोबाजी सांगत आले आहेत पण march of technology थांबत नाही. अवघड आहे एकंदरीत.

लेखाचे शेवटचे दोन परिच्छेद अगदी उत्तम. एकंदरीत लेख चांगला होता.

अरविंद केळकर, शोध, प्लॉट क्र. 7, जिजाऊनगर, यवतमाळ 445001 फोन क्र. 7232-24527



तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.