चमत्कार त्या रात्री कुठलाच झाला नाही
उपासनागृहात होते जेवढे काही लोक
सगळ्यांच्या ओठावर होते प्रार्थनेचे शब्द
अन डोळ्यांत श्रद्धेचे दीप
हे ईश्वराचे निवास्थान आहे
भूकंप हद्रवणार नाही ह्याला. नाही अग्नी जाळू शकणार
शेकडो चमत्कारच्या कथा सगळ्यांनीच ऐकल्या होत्या
शेकडो नावांनी त्या साऱ्यांनी धावा केला त्याचा
परलोकातूनही कोणाचाच आवाज आला नाही
ना परमेश्वराचा, ना पोलिसाचा
सारेच्या सारे होळपळून भस्म झाले आगीत
चमत्कार त्या रात्री कुठलाच झाला नाही
मूळ उर्दू कवी : गुलजार
मराठी अनुवाद : अनुराधा मोहनी
सुलेखन : मयूर आडकर