मनोगत

‘आजचा सुधारक’चा हा अंक वाचकांपुढे आणता आला, ह्यामागे एक सुरस पार्श्वभूमी अशी…

कुठल्याही अंकासाठी एरवी महिनाभर आधी पाठवले जाणारे आवाहन ह्यावेळी पाठवलेच गेले नाही. माणूस आहे, चुका होणारच, असे म्हणून सोडून देता येत असले तरी वाचकांप्रति उत्तरदायित्व तर असतेच. तेव्हा दहा दिवसांच्या मर्यादित काळात जे लेख येतील, ते घ्यावे आणि लेखांची संख्या अगदीच कमी वाटली, तर जुन्या लेखांच्या साठ्यातून काही निवडून घ्यावे, असे ठरवले.

परंतु, मिळालेला प्रतिसाद नेहमीप्रमाणेच उत्साहवर्धक ठरला. बरेच तात्कालिक विषय हाताळले गेले. पंतप्रधानांनी मॅकोलेच्या शिक्षणपद्धतीवर नव्याने केलेल्या विधानाला प्रतिसाद म्हणून लेख आले. जावेद अख्तर आणि मुफ्ती शमैल नवीद ह्यांच्यादरम्यान झालेल्या चर्चेवर प्रतिसाद आले. नोव्हेंबर महिन्यात सेवाग्राम येथे झालेल्या नास्तिक परिषदेत सहभागी झालेल्यांपैकी काहींनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. कम्युनिस्ट पक्षाने आपली शंभरी पूर्ण केली, त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेतला गेला. पुस्तक-परिचय आले.

लेखकांचा हा सहयोग आणि त्यावर वाचकांच्या अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया हेच ‘आजचा सुधारक’चे संचित आहे. त्याही नेहमीप्रमाणे याव्यात, ही अपेक्षा.

समन्वयक, आजचा सुधारक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.