कार्ल सिगमंड - लेख सूची

जशास तसे

दोन माणसे भागीदारीत काही व्यवहार करतात—-व्यापार म्हणा, हवे तर. जर दोघेही सचोटीने वागले, तर प्रत्येकाला तीन-तीन रुपये मिळतात—-एकूण सहा. जर एक जण सचोटीने वागला, पण दुसऱ्याने पहिल्याला फसवले, तर फसवणारा पाच रुपये कमावतो आणि फसणारा हात हलवत बसतो. नीटशा न जुळलेल्या भागीदारीत सचोटीच्या भागीपेक्षा कमी, म्हणजे पाचच रुपये एकूण कमाई होणे, हे व्यवहारात योग्यच आहे. …