विषय «इतर»

संपादकीय 

‘आजचा सुधारक’च्या तरुण चमूने घडवलेल्या विचारभिन्नता विशेषांकाचे आमच्या नव्या-जुन्या वाचकांनी जोरात स्वागत केले. नागपूर येथे ह्या अंकाचे एका देखण्या कार्यक्रमात विमोचन झाले. त्यानिमित्त ‘आजचा सुधारक’ व ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या भारतीय समाजात वेगळे मत मांडण्याचा अवकाश आक्रसत चालला आहे का?’ ह्या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात विभिन्न विचारधारांशी संबंधित वक्त्यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. ह्या सर्व बाबी आजच्या अस्वस्थ करणाऱ्या वास्तवातही सौहार्द व परस्पर संवादाची परंपरा अद्याप तग धरून आहे असा आशावाद जागवतात.

पुढे वाचा

स्टॅनफर्ड तुरुंग प्रयोग: नक्की काय समजायचे? 

तुरुंग, गुन्हेगारी, वचक, सामाजिक मानसशास्त्र 

तुरुंगरक्षकांमध्ये असलेले क्रूरपणा व आक्रमकता हे गुण ‘स्वाभाविक’ असतात की परिस्थितिजन्य ह्या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी करण्यात आलेल्या वादग्रस्त प्रयोगाचीही कहाणी. प्रयोगासोबातच प्रयोगकार्त्यांचे मानस उलगडून दाखवणारी व आपल्या आसपास असणाऱ्या काही प्रश्नाची उत्तरे सुचविणारी.. 

१७ ऑगस्ट १९७१ च्या सकाळी, कॅलिफोर्नियामधील पालो अल्टो परिसरात नऊ तरुणांच्या घरी जाऊन पोलिसांनी अटकसत्र चालवलं. त्या तरुणांवर कलम २११ आणि ४५९ (सशस्त्र दरोडा आणि घरफोडी) यांच्या उल्लंघनाचा आरोप ठेवण्यात आला होता. रीतसर झडती, बेड्या वगैरे सोपस्कार उरकून त्यांना वाजत गाजत (सायरनच्या आवाजात) पालो अल्टो पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

पुढे वाचा

जसे 

मला नाही ऐकू येत खूपसे आवाज 

मुंग्यांच्या साखर कुरतडण्याचा आवाज 

पाकळ्या उमलतात एक-एक त्यांचा आवाज 

गर्भात पडतो जीवनाचा थेंब त्याचा आवाज 

पेशी नष्ट होतात आपल्याच शरीरात त्याचा आवाज 

या वेगातल्या, खूप वेगातल्या पृथ्वीच्या झंझावातात 

मला ऐकू येत नाहीत खूप आवाज 

तसंच तर 

असणार त्याही लोकांच 

ज्यांना ऐकू येत नाही गोळ्या चालवण्याचे आवाज 

तात्काळ 

आणि विचारतात कुठे आहे पृथ्वीवर किंकाळी ? 

(अनुवाद सतीश काळसेकर) 

नव्या वसाहतीत या साहित्य अकादमीतर्फे २०११ साली प्रकाशित पुस्तकातून साभार 

पाळत 

संगणक, संगणकाची सर्वव्यापकता 

आपल्या सर्व हालचाली व व्यवहार ह्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे व ती माहिती परस्पर कंपन्या किंवा सरकारला पुरवली जात आहे. कोणत्या जहागिरदाराची पळत सहन करायची, एव्हढेच आपण ठरवू शकतो. ह्या वास्तवाचे आपल्याला भान करून देणारा ब्रूस श्रीयरच्या ‘डेटा अँड गोलायथ’ (प्रकाशक नॉर्टन बुक्स) या पुस्तकाची ओळख करून देणारा हा लेख, 

गेल्या वर्षी माझा फ्रिज बिघडला तेव्हा दुरुस्ती करणाऱ्याने त्याचा संगणक बदलला. मला वाटत होते तसा फ्रिज संगणकाने चालवला जात नव्हता, तर संगणकच यंत्राद्वारे अन्न थंड ठेवत होता.

पुढे वाचा

भारतीय चर्चापद्धती : वादपद्धतीशी समांतर संकल्पना आणि वादपद्धतीचे महत्त्व : 2 

चर्चापद्धती, वाद, ब्रह्मोद्य, वाकोवाक्यम्, ब्रह्मपरिषद 

ह्या लेखमालेच्या पहिल्या भागात आपण ‘वाद’ ह्या संकल्पनेच्या स्वरूपाची चर्चा केली. भारतीय परंपरेत चर्चेच्या इतरही काही पद्धती होत्या, ज्यांना चर्चाविश्वात प्राधान्य मिळाले नाही. त्या सर्व संकल्पनांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे अंतर्गत संघर्ष झाला असावा, किंवा त्यांच्या स्वरूपाविषयी अधिक चर्चा होऊन त्यांच्यात अधिक विकास होऊन ‘वाद’ ही संकल्पना सुनिश्चित झाली असावी. त्या संकल्पनांचा हा अल्प परिचय. 

कोणत्याही चर्चेत, वादात प्रश्न विचारणे अपरिहार्य असते. आपण प्रश्न म्हणजे काय?’ असा प्रश्न कधी विचारत नाही. बहुधा इंग्लिशमधील What means what ?

पुढे वाचा

संधिकाल 

स्वातंत्र्यलढा, सत्याग्रह, टिळक, गांधी 

लोकमान्य ते महात्मा ह्या दोन युगांमधील स्थित्यंतराचा हा मागोवा. ह्या दोन्ही लोकोत्तर नेत्यांमधील साम्य-भेद व त्यांचे परस्परांविषयीचे मूल्यांकन टिपणारा. 

इ.स. 1914 हे वर्ष भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण होते. मंडालेमधील सहा वर्षांचा कारावास भोगून 16 जून 1914 रोजी लोकमान्य टिळक मायदेशी परतले. याच वर्षी साउथ अफ्रिकेतील सत्याग्रहाची यशस्वी सांगता होऊन गांधीदेखील भारताला परतण्यासाठी निघाले. परंतु वाटेत इंग्लंडला पोहोचता पोहोचता पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि गांधीचे स्वगृही परतणे जानेवारी 1915 पर्यंत लांबले. इ.स. 1914 ते 1920 हा कालखंड स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील संधिकाल होता.

पुढे वाचा

अंधश्रद्धानिर्मूलनाची एक गोष्ट

घराची बरीच दुर्दशा झालेली असताना दुरुस्ती व देखभालीचे काम काढायचे ठरले. ठेकेदार मिश्रीलाल ह्यांना ठेका देण्यात आला. दुसऱ्याच दिवशी त्यांनी, दोन लेबर बाजूच्या सर्वंट क्वार्टरमध्ये आणून ठेवतो असे आम्हाला सांगितले व त्याबरोबरच हेही बजावले, की त्या लेबर लोकांना काहीही द्यावयाचे नाही. ते स्वतःची व्यवस्था करून घेतील. तुम्हाला कटकट नको म्हणून आधीच सांगतो.

किशोर, ललिता व त्यांचे एक वर्षाचे बाळ दुसऱ्या दिवशीच आले. झोपलेल्या बाळाला खाटेवर टाकून ललिताबाईने आपला संसार थाटण्यास सुरुवात केली. एका तासाच्या आतच त्या गचाळ सर्वेंट्स् क्वार्टरचा कायापालट झाला व तीन दगडांच्या चुलीवर भात मांडला गेला.

पुढे वाचा

जातींची उपपत्ती : एक उपसिद्धान्त

जाती कश्या निर्माण झाल्या ह्याविषयी काही मते मांडली गेली आहेत आणि बहुतेकांची मते मनुस्मृती आणि तत्पूर्वी लिहिले गेलेले पुरुषसूक्त ह्यापलीकडे गेलेली नाहीत. मनुस्मृतीची भाषा पाहिली तर ती अर्वाचीन आहे. तिची रचना छंदोबद्ध आणि व्याकरण पाणिनीय आहे. त्यामुळे तिचा काळ फार प्राचीन असू शकत नाही. मनुस्मृति हा ग्रंथसुद्धा कोणा एका ‘मनु’ नावाच्या ब्राह्मणाने रचला असण्याची शक्यता नाही. मनु हे नाव कोणी मानवांचा आदिपुरुष कल्पून त्याला दिले आहे असे जाणवते. मानवाचा आदिपुरुष कोण? मनु. म्हणून मनूचे ते मानव. मनुस्मृति ह्या ग्रंथात त्या काळात प्रचलित असलेल्या समजुतींचा संग्रह आहे, असे म्हणायला पुष्कळ वाव आहे.

पुढे वाचा

शेवटचा स्टॉप नाही!

“म्हणजे एकंदरीतच वेदान्त हा मानवी कल्याणाचा विचार दिसतो. तिथे ‘हिंदू’ ‘इस्लाम’ या लेबलांना स्थान नाही. हे पाहता सतत मनात येणारा एक प्रश्न तुला विचारतो, ‘संघपरिवाराला विवेकानंद एवढे जवळचे कसे काय वाटतात व डाव्या पुरोगामी मंडळींना ते निदान कालपर्यंत तरी जवळपास पूर्णत: अस्पृश्य होते हे कसे काय?’

‘हे बघ मित्रा, समाजातील उच्च स्थान, प्रभाव व कर्तृत्व यांनी फार मोठ्या असलेल्या व एरवी अत्यंत आदर वाटावा अशा अनेक व्यक्ती विचारांच्या उदारतेच्या प्रांतात त्या त्या परिस्थितीच्या मर्यादा ओलांडू शकत नाहीत असे दुर्दैवाने घडताना अनेकदा दिसते खरे.

पुढे वाचा

धोरणकर्त्यांचे अपयश

देशात परिवर्तनाची लाट आलेली आहे. शहरे बदलत आहेत, गावे पूर्वीसारखी हिली नाहीत. शिकलेल्यांचे उत्पन्न वाढत आहे. पिरॅमिडच्या तळातल्या म्हणजे खालील लोकांना मोफत भेटी दिल्या जात आहेत. अशा वेळी भारतीय समाजाचा घटक अस्पृश्यासारखा वेगळा पडलेला दिसतो आहे. तो आहे साठ कोटी ख्येचा शेतकरी समुदाय. सतरा वर्षांत सुमारे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या आहेत. ६५ टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. हे असे क्षेत्र आहे की ज्यामध्ये देशाची सर्वाधिक लोकसंख्या कमीत कमी उत्पन्नावर आहे. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचा वाटा सातत्याने घसरतो आहे.

पुढे वाचा