कै. अनंत य. कोपरकर - लेख सूची

स्वेच्छामरण : राष्ट्रव्यापी मोहीम सुरू करण्याची गरज

‘मृत्यू’ शब्दाला बहुतेक सर्वजण फार घाबरतात. “जातस्य हि ध्रुवो मृत्युः” किंवा “मरणं प्रकृतिः शरीरिणाम्’ ही सुभाषिते जरी पाठ असली, तसेच केव्हा ना केव्हा प्रत्येकाला मृत्यूयेणारच हे जरी सर्वांना माहीत असले, तरीही कोणाच्याही मृत्यूची चर्चा करणे अशिष्टपणाचे मानले जाते. शुभअशुभाच्या कल्पनांचाही आपल्या समाजावर जबरदस्त पगडा आहे. त्यामुळे कोणाच्याही मृत्यूबद्दल बोलणे अशुभ, अयोग्य मानले जाते. स्वतःच्या मृत्यूविषयीसुद्धा …