स्वेच्छामरण : राष्ट्रव्यापी मोहीम सुरू करण्याची गरज

‘मृत्यू’ शब्दाला बहुतेक सर्वजण फार घाबरतात. “जातस्य हि ध्रुवो मृत्युः” किंवा “मरणं प्रकृतिः शरीरिणाम्’ ही सुभाषिते जरी पाठ असली, तसेच केव्हा ना केव्हा प्रत्येकाला मृत्यूयेणारच हे जरी सर्वांना माहीत असले, तरीही कोणाच्याही मृत्यूची चर्चा करणे अशिष्टपणाचे मानले जाते. शुभअशुभाच्या कल्पनांचाही आपल्या समाजावर जबरदस्त पगडा आहे. त्यामुळे कोणाच्याही मृत्यूबद्दल बोलणे अशुभ, अयोग्य मानले जाते. स्वतःच्या मृत्यूविषयीसुद्धा कोणाला आपले विचार मोकळेपणाने मांडता येत नाहीत. कोणी बोलूच देत नाहीत. अलीकडे मात्र, निदान वयोवृद्धांमध्ये तरी या विषयावर थोडीबहुत चर्चा होऊ लागली आहे.
“आत्महत्या” करणार्याू व्यक्तीबद्दल आपल्याकडे तरी अजूनही कोणी मोकळ्या मनाने विचार करीत नाहीत. त्या व्यक्तीने काही बरे कृत्य केले असे समजतनाहीत. त्याव्यक्तीला अविचारीच ठरवले जाते. त्याव्यक्तीचे मानसिकसंतुलन बिघडले असावेअसेसमाजसमजतो. पूर्णपणे विचारपूर्वक कोणी मरणाला कवटाळेल हे कोणालाचपटत नाही. “तात्पुरत्या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्याव्यक्तीने अविचारीपणाने आत्मघात करून घेतला असेच लोक समजतात. त्यामागे काही दुःखद घटना घडली होती का; अथवा तीव्यक्ती कुठल्या अडचणीत किंवा कोंडीत सापडली होती का, याचाच शोधघेण्याची खटपट केली जाते. बर्याुच आत्महत्यांच्या बाबतीत असेच काही तरी तात्कालिक कारण असते हेही खरेचआहे. परंतु एखाद्याव्यक्तीलाकोणत्याही कारणाने वैतागनयेता सुद्धा जगण्यातले स्वारस्यकमी होऊ शकते हे वयोवृद्धत्व न आलेल्या व पूर्णपणे कार्यक्षम असणान्यांना पटणे कठीण असते; किंबहुना त्याचेआकलन होणेही कठीण असते. स्वतःच्या जगण्यामुळे पृथ्वीवरील भार विनाकारणवाढतो असा विचार अविचारी नव्हे, तर सुविचारी व समजूतदार माणूसच करू शकतो.“मरण येत नाही म्हणून जगायचे असे पुष्कळ वयोवृद्धांना वाटत असते’. अर्थात त्यातले फारच थोडे त्यांची ही भावना दुसर्याुजवळव्यक्त करतात.कारण वरम्हटल्याप्रमाणे आपल्यासमाजात मृत्यूबद्दल बोलायलाच नव्हेतर ऐकायला सुद्धा कोणीही तयार नसतो.
हे मात्र खरे की ज्या व्यक्तीवर अन्य कोणी व्यक्ती अवलंबून असते अशा व्यक्तीने आत्महत्या करणेहा काहीसाअविचारच ठरेल.ज्याच्यावर केवळ आर्थिकदृष्ट्यांचनव्हे तर मानसिकवाभावनिक दृष्टीनेसुद्धा कोणीही अवलंबून नसेल अशा व्यक्तीने आत्महत्येचा विचार केला तर तो अविचार म्हणता येणारनाही. दुसन्याशब्दांत सांगायचे तर ज्याच्या मृत्यूमुळे कोणाचेही काहीही नुकसान होणार नसेल त्यानेच तो मार्ग अनुसरणे योग्य ठरेल.
इच्छामरणाचा उघडपणे पुरस्कार करून त्यानुसार इच्छामरणाचा मार्ग अनुसरणारे पुण्याचे कै. गो.शि. मंडलीक हे या विषयाचे आद्य प्रवर्तक मानावे लागतील. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी वृत्तपत्रांना, मासिकांना मुलाखती देऊन या विषयाचा ठामपणे प्रचार केला व त्या नंतर थोड्या कालावधीत स्वेच्छामरण स्वीकारले. श्री. मंडलीक यांना मुले नव्हती. पत्नीची जबाबदारी होती ती संपल्यावर ‘खायला काळवधरणीलाभार” होण्याचेनाकारून त्यांनी हा निर्णय घेतला. त्याघटनेवर झालेल्या मतप्रदर्शनामध्ये बर्याभच टीकाकारांकडून असा विचार मांडला गेला की “श्री. मंडलिकांवर जरी कोणी अवलंबूननसेल तरीत्यांनाकाहीना काही समाजकार्यकरूनआपले आयुष्य सार्थकी लावता आले असते.” अजूनही बर्याहच लोकांना असे वाटते की ज्याला उदरनिर्वाहासाठी काही धडपड करावयाची गरज नसेल, जो आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असेल, त्याने काही समाजकार्य करून आपला वेळ व्यतीत करावा. असा विचार करणारे हे वयोवृद्ध नसावेत असे मला वाटते. उतारवयात शारीरिक क्षमता किती कमी होत जाते याची तरुण वयात कोणाला कल्पना करता येत नाही. अनेक वृद्धांना स्वतःची दैनंदिन कामेही दुसन्याच्या मदतीशिवाय धडपणे करता येत नाहीत, त्यांनी काही समाजोपयोगी कामे करावीत ही अपेक्षा साफ चुकीची होय. आयुष्याच्या अखेरपर्यंत, वयाची नव्वदी होऊन गेली तरी सुद्धा काम करणार्याा व्यक्ती असतात. परंतु अशी लोकोत्तर व्यक्तिमत्त्वे अपवादात्मकच असतात. सर्वसामान्यांची कार्यक्षमता मर्यादितचअसते.
कोठलीही व्यक्ती सुखाकरिताच जगत असते. अगदी संपूर्ण आयुष्य समाजाच्या उद्धारासाठी” वेचणाच्या समाजसेवकांनासुद्धा त्या समाजसेवेतून मानसिक का होईना पण आनंदच मिळत असतो. ते त्यांचे ‘‘सुख”च असते. त्यांच्या समाजसेवेची त्यांना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे पावती’ मिळत असते. त्यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढते. ते सुद्धा एकप्रकारचे सुखच नव्हे का? आयुष्य म्हणजे कोणत्याना कोणत्याप्रकारच्या सुखाकरिता केलेली धडपड! पैसा किंवा संपत्ती हे सुखमिळविण्याचे एक साधन असल्यामुळे बहुतेक सर्वांना अर्थार्जनासाठी धडपड, मेहनत करावी लागते. प्रत्येकाची खूप त्रास, हाल सोसण्याची, मेहनत, श्रम करण्याची तयारी असते ती अर्थार्जनाकरता म्हणजेच सुखोपभोगाची साधने मिळविण्यासाठी म्हणून! पुष्कळांचे श्रम किंवा मेहनत ही अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी केलेली असते. परंतु बारकाईने पाहिले तर अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिकगरजा भागवणे म्हणजे सुद्धा सुखोपभोगचहोय. कारणत्या भागल्यानाहीत तर उपासमार, थंडी, अनारोग्य आदि दुःखे भोगावी लागतील. दुःख भोगण्याकरिता कोणीही माणूस जगत नसतो. अत्यंत हालअपेष्टांत व दुःखांतसुद्धा माणूस जगतो, जगण्याची इच्छा, उमेद बाळगतो. कारण ‘‘हेही दिवस जातील व भविष्यात सुख मिळेल’ अशी त्याला आशा वाटत असते. काही वेळा असे घडते सुद्धा. आजन्मकारावासाची शिक्षाझालेल्या कैद्यांनासुद्धा ‘‘काहीतरीअघटित घडून येईल आणि स्वतःची सुटका होईल’ अशी आशा कायम वाटत असते. राजवट बदलल्यामुळे असे कैदी सुटलेलेही आपण अनेकदा पहातो.
अशाप्रकारे सुख मिळत असेल किंवा भविष्यात सुख मिळण्याची शक्यता असेल तोपर्यन्तच कोणाही व्यक्तीला जगण्यात रस, आस्था किंवा स्वारस्य वाटते आणि ते नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे. म्हणजेच सुख उपभोगण्याची शक्यता दुरावली, क्षमता संपली म्हणजे कोणाचेही जगण्यातले स्वारस्य संपणारच! उतारवयांत सुखोपभोगातील रस किंवा आसक्ती सुद्धा कमी होते. अशा प्रकारेआयुष्यात काही अर्थ राहिला नाही असे वाटणार्याीला जगण्याची सक्ती करणे अयोग्य आहे.
समंजसव विचारी व्यक्तींना आणखी एका महत्त्वाच्या कारणासाठी स्वेच्छामरणयोग्यवाटते, आवश्यक वाटते. प्रत्येकाला स्वतःचा मृत्यू हालअपेष्टा न होता सुलभतेने यावा असे वाटत असते. रोगजर्जर होऊन, दुःख भोगत, हालअपेष्टांत बराच काळ काढल्यानंतर मृत्यू येण्याची कल्पना कुणालाच आवडत नाही. लोळागोळा होऊन परावलंबी जीवन जगण्याची वेळ स्वतःवर येण्यापूर्वीच तडकाफडकी मृत्यूयावा असेच सर्वांना वाटते.अशा लोळागोळा होऊन पडलेल्याव्यक्तीचे जगणे केवळ त्याव्यक्तीलाच नव्हे तर ज्या आप्तस्वकीयांनात्याव्यक्तीचीसेवाशुश्रूषा करावी लागते त्यांनाही असह्य झालेले असते. अनेक कुटुंबांमध्ये पतिपत्नी दोघेही नोकरी/व्यवसाय करीत असतात. त्यामुळे घरात एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीचे अस्तित्वही त्यांना मोठेच अडचणीचे होऊन बसलेले असते. त्याची सेवाशुश्रूषा करण्यासाठी त्यांना आळीपाळीने रजा घेऊन घरी राहण्याची वेळ येते. केव्हा एकदा म्हातारा/म्हातारी खपतोय असे त्याच्या मनात येत असते. सेवा करणारे आप्तस्वकीय समंजस असतील तर तसे बोलून दाखवत नाहीतइतकेच. काही वृद्धांना तर असे बोलणे ऐकूनही घ्यावे लागते. आजारापेक्षाही अशा बोलण्याच्या यातना त्या वृद्धांना अधिक असह्य होतात. अशी अनेक उदाहरणे दिसत असल्यामुळे सुजाण वयोवृद्धांना स्वतःवर अशी वेळ येऊ नये असे तीव्रतेने वाटत असते. त्यासाठी सुद्धा हातपाय धड असेपर्यंतच मृत्यू यावा अशी जवळजवळ सर्वांची इच्छा असते. परंतु त्यासाठी आत्महत्या करण्याचे मनोधैर्यत्यांच्यापाशीनसते. “देव मला विनायासेन मरण देईल” अशी श्रद्धा ते बाळगून असतात.
ज्याची जगण्यातली आसक्ती, किंबहुना इच्छा सुद्धा पूर्णपणे संपलेली आहे अशा व्यक्तींच्या संदर्भातील विचारच आतापर्यंत मांडलेले आहेत. अशा मरणेच्छू व्यक्तीच्या बाबतीत कोणी असे म्हणेल की ज्याला मरायचं आहे त्याला कुणी अडवलंय? त्याला मरायला पुष्कळ मार्ग उपलब्ध आहेत’, असे म्हणणे जरी सोपे असले तरी स्वतःच्या आयुष्याचा अंत स्वतःच घडवून आणणे हे दुसन्याचा खून क्ररण्याइतके कठीण नसले, तरी अगदीच सोपे काम नक्कीच नाही. कदाचित खून करण्यापेक्षाही त्याला अधिक मनोधैर्याची आवश्यकता आहे असे मला वाटते. तसेच अशा मरणेच्छु व्यक्तीलासुद्धा स्वतःचा मृत्यूसुलभववेदनारहित असावा असेवाटणे स्वाभाविक आहे. येथे दुःखाच्या, अपमानाच्या किंवा वैतागाच्या भरात जीव देऊन टाकणान्यांचा नव्हे, तर विचारपूर्वक मरण स्वीकारणाच्यांचा विचार अभिप्रेत आहे. अशा व्यक्तीसाठी मरण घडवून आणण्याचा काहीतरी सुलभ मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर जगण्याची आसक्ती संपलेल्या, परंतु थोड्याफार कमकुवत मनाच्या व्यक्तीची मानसिक दृष्ट्याही तयारी करणे हेही काहीवेळा आवश्यक ठरते. मनावर धार्मिक विचारांचा पगडा असणान्यांना “आत्महत्या’ हे सुद्धा मोठे पाप वाटते. अशा लोकांच्या मनावरील पापशंकेचा पगडा दूर करणे योग्य आहे, गरजेचे आहे.
“स्वेच्छामरण?” या विषयाचा विचार आणखी एका वेगळ्या दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे. भारताची वाढती लोकसंख्या ही भारतापुढील सर्वांत मोठी समस्या आहे, याची सर्वांना जाणीव आहे. वाढलेले जननप्रमाण हे त्या समस्येचे खरे कारण नव्हते; वैद्यकशास्त्राच्या प्रगतीमुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे हे त्याचे खरे कारण आहे. लोकसंख्या मर्यादित ठेवण्याचे दोन मार्ग असतात. जन्माचे प्रमाण कमी करणे हा एक आहे वभारताच्या नियोजन संकल्पनेत त्यालाच महत्त्व दिले जाते. कुटुंबनियोजन व संततिनियमन हे शब्द समानार्थी असल्यासारखा “कुटुंबनियोजन’ हा शब्दसंततिनियमन” या ऐवजी वापरला जातो. परंतु खरे तर, जगण्याची इच्छा न राहिलेल्या व्यक्तीला मृत्यूस्वीकारण्यास साह्य करणेयाचा सुद्धाअंतर्भाव कुटुंबनियोजन यासंकल्पनेमध्ये करावयासहवा. मरणेच्छू व्यक्तीला मरण प्राप्त करून घेण्यास विरोध करणे, जगण्याची सक्ती करणे हे तर अतिशय चुकीचे, अयोग्य व राष्ट्रहिताच्या विरुद्ध आहे. उलट अशा व्यक्तीला मरण स्वीकारण्यास सर्वतोपरी मदत करणे, एवढेचनव्हे तर त्याला तसे करण्यास प्रवृत्त करणे हाचराष्ट्रहिताचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे अशा मरणेच्छू व्यक्तीला त्याच्या इच्छेच्या पूर्तीसाठी योग्य व आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे हे सर्व सुजाण व राष्ट्रभक्त व्यक्तींचे कर्तव्य ठरते. तसेच या विषयाचा प्रचार व प्रसार करणे हे अयोग्य तर नव्हेच परंतु व्यापक राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून इष्ट आहे, आवश्यक आहे.
सांप्रत मात्र असे काहीही करण्यास प्रचलित कायद्याची एक मोठीच अडचण आहे. भारतीय दंडविधान कलम ३०६ अन्वये “आत्महत्या करणार्या. व्यक्तीला कोणत्याही प्रकारे मदत करणे किंवा प्रवृत्त करणे” यागुन्ह्याला दहा वर्षेकारावास वदंड अशी शिक्षा दिली जाऊ शकते. यामुळे आत्महत्या करणाच्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाइकांना किंवा परिचितांना पोलिसांकडून त्रास होण्याची, खटलासुद्धा भरला जाण्याची शक्यता असते. मरणाप्याव्यक्तीने आत्महत्या करून घेत असल्याबद्दल चिट्ठी लिहून ठेवली असली तरीसुद्धा संबंधितांना त्रास होण्याची शक्यता पूर्णपणे नष्ट होत नाही. त्या चिट्ठीचा खरेखोटेपणा पडताळून पाहाणे पोलिसांना आवश्यक ठरते, योग्य असते. ती चिठ्ठी वेळेवर सापडली नाही तरीही पंचाईत होऊ शकते. या सर्व कटकटी टाळण्यासाठी मरणेच्छू व्यक्तीला तो मार्ग सुलभतेने व अधिकृतपणे उपलब्ध करून देणे ही आता काळाची गरज झाली आहे. तसेच या विषयाचा प्रचार करणे, तसेच वयोवृद्ध मरणेच्छू व्यक्तीला मानसिक आधार व बळ देऊन त्यासाठी प्रवृत्त करणे, या गोष्टी भारतीय दण्डविधान कलम ३०६ च्या अमलातून वगळणे हेही आवश्यक आहे.
लोकसंख्यावाढीचा धोका ओळखून, त्यावर उपाय म्हणून जननसंख्या कमी करणे या मार्गाचा व त्यासाठी संततिनियमनाच्या साधनांचा प्रसार व प्रचार करण्याचा विचार सुमारे ५०-६० वर्षापूर्वीमहाराष्ट्राचे महान व लोकोत्तर व्यक्तिमत्त्व कै. र. धों. कर्वे यांनी धडाडीने अंमलात आणला. त्यासाठी प्रखर विरोध, हेटाळणी, अवहेलना, मानहानीवत्रास सहनकेला. दारिद्रयभोगले. त्याकाळी अतिशय पुरोगामी व धाडसीवाटणारे संततिनियमनाचे विचार आता समाजातनको इतकेभिनले आहेत, रुळले आहेत, मान्यता पावले आहेत. शासकीय प्रसारमाध्यमांच्याअतिरेकी वअविवेकी प्रचारामुळे तर त्या विषयाचा अगदी पोरखेळ करून टाकला आहे, त्यांचे गांभीर्य पार घालवून टाकले आहे. ५०-६० वर्षापूर्वी मात्र कै. र. धों. कर्त्यांच्या संततिनियमनाच्या प्रचारामुळे समाजात प्रचंड खळबळ उडवून दिली होती.
स्वेच्छामरणाची, नव्हे मरणेच्छू व्यक्तीला मृत्यू सुलभतेने व अधिकृतरीत्या उपलब्ध करून देण्याची संकल्पना, तसेच स्वेच्छामरणाचा प्रसार करण्याची व मरणेच्छू व्यक्तीला त्यासाठी प्रवृत्त करण्याची संकल्पना, या गोष्टी सध्या जरी धाडसी वाटत असल्या तरी नजीकच्या भविष्यकाळात त्यांना समाजाची व शासनाची मान्यता मिळेल यात शंका नाही. सुमारे २५-३० वर्षानंतर मात्र समाजातील वयोवृद्धांचे प्रमाण फारच वाढेल व त्यावेळी या विषयाचा विचार अपरिहार्य होऊन बसेल हे नक्की.
स्वेच्छामरण या शब्दाचे अर्थ दोन प्रकारे लावले जातात. काहींच्या मते एखाद्या शारीरिक व्याधीमुळे जगणे अतिशय दुःखदायक, किंबहुना असह्य झालेल्या, परंतु स्वतःचा मृत्यूस्वतःचघडवून आणणे अशक्य झालेल्या व्यक्तीला त्याच्या पूर्वघोषितइच्छेनुसार मृत्युदान देणे म्हणजे स्वेच्छामरण. खरेतर त्याला दयामरणम्हणणे योग्य ठरेल. दुसरा अर्थ म्हणजे स्वतःच्या हातानेस्वतःचा मृत्यूघडवून आणणे, किंवा “आत्महत्या’. (दुर्दैवाने स्वेच्छामृत्यूचे पुरस्कर्तेसुद्धा या शब्दाला निष्कारण बिचकतात). या लेखात ‘‘आत्महत्या” या अथनिचस्वेच्छामरणाचा विचार केला आहे.
स्वेच्छामरणाचा बर्याआचवर्षांपासून पुरस्कार करणारे वपुलोद मंत्रिमंडळात मंत्री असतानाया विषयावर ज्यांनी एक विधेयक विधिमंडळास सादर केले होते त्या प्रा.सदानंद वर्दे यांच्या मतानुसार, ज्याचा मृत्यू घडवून आणायचा त्या व्यक्तीच्या इच्छेचा ‘दयामरणा’मध्ये प्रश्नच नसतो. असाध्य रोगाने जर्जर झालेल्या रुग्णाचा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी, रुग्णाच्या जवळच्या नातेवाइकांच्या संमतीने घडवून आणलेला किंवा उपचार बंद करून होऊ दिलेला मृत्यू म्हणजे दयामरण. त्यांच्या मतानुसार प्रकृती व मनःस्थिती उत्तम असताना एखाद्याने स्वतःच्या मृत्यूबद्दल काही सूचना किंवा इच्छा लिखित स्वरूपात व्यक्त करून ठेवली असेल तर त्या लेखात किंवा इच्छापत्रात लिहून ठेवल्याप्रमाणे त्या व्यक्तीची शारीरिक व मानसिक स्थिती झाल्यावर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्या व्यक्तीचा पूर्वघोषित इच्छेनुसार घडवून आणलेला किंवा होऊ दिलेला मृत्यू म्हणजे इच्छामरण.
सांगली येथील श्री. विनायक राजाराम लिमयेयांची स्वेच्छामरणाची कल्पना थोडीशी वेगळी आहे. पूर्वघोषित इच्छेनुरूप, नंतर केव्हातरी नव्हे, तर स्वेच्छामरणेच्छू व्यक्तीने स्वेच्छामरण स्वीकारण्याचे ठरवल्यावर त्याच वेळी, योग्य त्या अधिका-यांसमक्ष अर्ज देऊनव प्रतिज्ञालेख लिहून दिल्यावर त्या लिखित इच्छेनुरूप वैद्यकीय अधिकार्यायने अधिकृत व्यक्तींच्या अनुपस्थितीत प्राणघातकद्रव्याचेइन्जेक्शन देऊन घडवून आणलेला मृत्यू म्हणजेचइच्छामरणअसे त्यांचेप्रतिपादन आहे. त्यासाठी सुलभ प्रसूतिगृहाप्रमाणेच प्रत्येक जिल्ह्यात “महानिर्वाणगृहे” शासनाने स्थापन करावीत असे ते म्हणतात.
श्री. सदानंद वर्दै काय किंवा श्री. विनायकराव लिमये काय, दोघांनाही मरणेच्छू व्यक्तीचा प्रत्यक्ष मृत्यू अन्य व्यक्तीनेच घडवून आणणे अभिप्रेत आहे हे स्पष्ट आहे. परंतु यात अनेक अडचणी आहेत. शासनालाच नव्हे तर समाजाला सुद्धा अशा तर्हेेने एका व्यक्तीने दुसर्या व्यक्तीचा घडवून आणलेला मृत्यू म्हणजे ‘खून’च वाटणार. मग तो कोणत्याही परिस्थितीत वा कोणत्याही कारणाने घडवून आणलेला का असेना! असा मृत्यू घडवून आणायला योग्य अशी तज्ज्ञ व्यक्ती मिळणे कठीण नव्हे अशक्यच आहे. अट्टल गुन्हेगाराला फाशी देण्यासाठी मांगाचे काम करणारासुद्धा अलीकडे मिळेनासा झाला आहे. जे कोणी ते काम करतात त्यांना सामाजिक प्रतिष्ठाशून्य! मगप्रतिष्ठेचा गणला गेलेला, जीव वाचवण्याचाडॉक्टरी पेशास्वीकारलेला कोण सुज्ञ डॉक्टर दुसन्याचा जीवघेण्याचेकाम करायला तयार होईल?शिवाय अशा तर्हेाने घडवून आणलेल्या मृत्यूबद्दल नंतर कोणी काही वाद उपस्थित केला तर त्याला तोंड देण्याचेही काम त्या डॉक्टरला करावे लागणार. त्यामुळे कोठल्याही परिस्थितीत एकाने दुसन्याचा मृत्यूघडवून आणणेयाअथनिइच्छामरणाला समाजाची सुद्धा मान्यता मिळणे शक्य नाही, तर शासनाची मान्यता कुठून मिळणार?
अशा परिस्थितीमध्ये ज्या वयोवृद्ध व्यक्तीला जगण्यात स्वारस्य राहिले नसेल, परंतु आत्महत्या करण्याचे मनोधैर्यनसेल, किंवात्यासाठी योग्य तो मार्गवासाधन कोणते याचा निर्णय होत नसेल, त्याला आत्महत्येसाठी साधन पुरविणारी व अशा स्वेच्छामरणाची म्हणजेच आत्महत्येची देखरेख करणारी अधिकृत यंत्रणा निर्माण करणे एवढ्यापुरताच स्वेच्छामरणाचा विचार करता येईल. म्हणजेच थोडा फरक करून श्री. वि.रा. लिमये यांची महानिर्वाणगृहाची किंवा निरोप घराची कल्पना अमलात आणावी लागेल. मात्र त्यापूर्वी भारतीय दण्डविधान कलम ३०६ मध्ये आवश्यक ती दुरुस्ती करून घेणेव ६० वर्षाच्या वरील वृद्धांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा, तसेच महानिर्वाणगृहाच्या किंवा निरोपघराच्या यंत्रणेचा अपवाद करावा लागेल.
पोटॅशियम सायनाईड हे तात्काळ मृत्यू घडवून आणणारे द्रव्य कॅप्सूलच्या स्वरूपात अतिरेक्यांनी वापरल्याचे बर्यातच वेळा वाचण्यात येते. परंतु ते सर्वसामान्यांना सहजपणे व अधिकृतपणे उपलब्ध होत नाही; आणि ते योग्यच आहे. कारण ते खून करण्यासाठी वापरले जाण्याचीही शक्यता असते. महानिर्वाणगृहामध्ये/निरोपघरामध्ये ते नियंत्रित स्वरूपात उपलब्ध करून देता येईल व त्याचा वापर मरणेच्छूव्यक्ती स्वतःसाठीच करीत आहे याची खात्री करण्यासाठी म. नि. गृहाच्या अधिका-यांसमक्षच त्याचा वापर करावा लागेल. अर्थात म. नि. गृहाच्या सविस्तर कार्यपद्धतीबद्दलचा विचार त्यांच्या स्थापनेची वेळ येईल तेव्हा करता येईल. आजच्या घडीला आवश्यकता आहे ती स्वेच्छामरणाचा विचार जनमानसात रुजविण्याची नि भारतीय दण्डविधान कलम ३०६ मध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यासाठी शासनावर प्रभाव पाडण्याची. कायदे करून कोणत्याही सुधारणा होत नसतात हे खरे आहे. त्यासाठी समाजाची मानसिकताच बदलण्याची आवश्यकता असते. स्वेच्छामरणाच्याही बाबतीत ठिकठिकाणी लेखप्रसिद्ध करून सभासंमेलनांतून व्याख्याने, चर्चा घडवून आणून भरपूर प्रचार व प्रसार केला तरच समाजमनामध्ये थोडेफार परिवर्तन होऊ शकेल. मात्र भा. दं. वि. कलम ३०६ मध्ये योग्य त्या दुरुस्त्या केल्याशिवाय हल्लीच्या स्वरूपातील तरतुदींचा स्वेच्छामरणाच्या संकल्पनेला असलेला अडथळा दूर होणार नाही व स्वेच्छामरणाच्या संकल्पनेला अधिकृतपणा देता येणार नाही. भारतीय दण्डविधान हा देशव्यापी स्वरूपाचा कायदा आहे. भारतभर आंदोलन उभारून समाजमनात परिवर्तन घडवून आणून, भा. दण्डविधानात दुरुस्ती घडवून आणणे दुरापास्त आहे. मराठी समाज त्या मानाने बराच प्रागतिक विचारसरणीचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रापुरती अशी दुरुस्ती करून घेणे शक्य आहे. समविचारी ज्येष्ठ नागरिकांनी यासाठी चळवळ उभी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र यावयास हवे. गावोगावच्या ज्येष्ठ नागरिकसंघांना हे कार्य करता येण्यासारखे आहे. एवढेच नव्हे तर लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यास एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून त्यानी ते अंगीकारले पाहिजे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.