कै. वे. शा. सं. विष्णुभट गोडसे वरसईकर - लेख सूची

दीडशे वर्षांपूर्वीच्या रामजन्मभूमीचे वर्णन

“ …रामनवमीचे दिवसी असे तेथे माहात्म्य आहे की, दोन प्रहरी शरयू गंगेत स्नान करून रामजन्म ज्या जाग्यावर जाहालेला आहे तेथे जाऊन जन्मभूमीचे दर्शन त्या समई ज्यास घडेल त्यास पुनः जन्म नाही, असे श्रुतिस्मृति पुराणप्रसिद्ध आहे. म्हणोन सर्व लोक जन्म दिवसी मध्यान्ही स्नाने करून हातात तुलसी, पैसा-सुपारी घेऊन सर्व लोक जन्मभूमीचे दर्शन घेऊन तुलसी तेथे वाहातात. …