विषय «उवाच»

मनोगत

ज्या माणसाला म.गांधींच्याविषयी अतीव श्रद्धा आणि आदर आहे त्या माणसाने गोळवलकर गुरुजी आणि सावरकर यांच्याहीविषयी आपल्या मनात अत्यंत आदर आहे, हे सांगणेच आपल्याला प्रथमत: पटत नाही. कारण आपण मनातल्या मनात दोन गोष्टींची सांगड घालून टाकलेली आहे. एखाद्या व्यक्तीविषयी मनात आदर असणे आणि त्या व्यक्तींची मते, निदान प्रमुख मते अजिबात मान्य नसणे या दोन गोष्टी एकत्र संभवतात, हेच आपण विसरून गेलेलो आहोत. वर्तमानकाळातील लोकांना ज्या व्यक्ती परस्परांच्या विरोधी उभ्या राहिलेल्या दिसतील, त्या व्यक्ती खरोखरीच भविष्यकाळातल्या मंडळींना एकमेकांच्या विरोधी वाटतील असे नाही. लो.टिळक

पुढे वाचा

नवा पर्यावरणवाद

नवा पर्यावरणवाद गेल्या काही दशकांत पर्यावरणीय जाणिवा अधिक प्रगल्भ झाल्या असून मानवी-सामाजिक जीवनाचा अधिक परिपूर्ण रीतीने विचार त्यातून पुढे आला आहे. शुद्ध हवा, पाण्याचे शुद्ध व निरंतर स्रोत, स्वच्छ सूर्यप्रकाश, नितळ आकाश वा चांदणे, या सृष्टीबद्दल वा इतर जीवांबद्दल प्रेम-कुतूहल, समृद्ध सांस्कृतिक- सामाजिक जीवन, जंगल-झाडे, प्राणी-पक्षी यांचे अस्तित्व या गोष्टी अधिक समृद्ध जीवनासाठी आवश्यक असतात. आदिवासी, कष्टकरी, शेतकरी यांच्यासाठीतर अधिकच. त्यांच्या जीवनाचा तो सहज भाग असतो. जीवनाची गुणवत्ता व सौंदर्य हा सर्वांचाच अधिकार आहे. कष्टकरी वर्गाचा देखील. पर्यावरणीय व सांस्कृतिक उन्नयनाचा त्यांच्याशी संबंध नाही असे म्हणणे हे भांडवलशाही राजकारणाचा भाग आहे.

पुढे वाचा

ज्ञानाची बहुलता

या चळवळींतून व विकासाच्या समीक्षेतून आजवरच्या वर्चस्ववादी ज्ञानविज्ञानावरही सवाल केले गेले आहेत व ज्ञानविज्ञानांचे बहुलवादी अस्तित्व ठसवले गेले. एका वर्गाचे ज्ञान किंवा अमुक प्रकारचेच विज्ञान यांना एकमेवाद्वितीय, प्रमाण मानण्याऐवजी प्रत्येक समाजघटकाचे व विभिन्न देशकालातील अनुभव व प्रयोगांनी सिद्ध होत आलेले ज्ञान-विज्ञान देखील महत्त्वाचे आहे, प्रमाण आहे, जी जाणीव अनेक चळवळी रुजवत आहेत. एखाद्याच वर्गाच्या, एकाच विशिष्ट कालातील वा भूभागातील व एकाच पद्धतीच्या ज्ञानाचे प्रमाण्य व त्याची मक्तेदारी असणे हे सुद्धा वर्चस्वाचे व शोषणाचे एक मुख्य कारण आहे. साधारण जनसमूह सुद्धा शेकडो वर्षे आपली बुद्धी, सर्जनक्षमता व परंपरेने शेती, पाणी, आरोग्य, तंत्रविज्ञान विकसित करत आले आहेत.

पुढे वाचा

सम्यक जीवनशैली

या सर्वांना जोडून सामाजिक व व्यक्तिगत जीवनशैलीबद्दल आखणी करणे व धोरण असणे आवश्यक बनले आहे. जीवनशैलीचा मुद्दा उपभोगाशी, वस्तू व साधनसंपदेच्या वापराशी निगडित आहे. उपभोगवाद किंवा चंगळवाद हा मुद्दा व्यक्तिवादी नैतिकतेबरोबरच सामाजिक नीतीचा (सोशल मॉरॅलिटी), आपल्याशिवाय इतरांच्या लोकशाही हक्कांचा व साधनसंपत्तीविषयक धोरणांचा आहे. प्रत्येकाने किती पाणी, वीज, जंगल, नैसर्गिक साधनसपंत्ती वापरावी, इथपासून किती धन व वस्तूसंग्रह करावा येथपर्यंत अनेक बाबी वापरण्यावर कमाल मर्यादा येतील. अमेरिका-युरोपप्रमाणे दरमाणशी वीजवापराचे व अन्य उपभोगाचे उद्दिष्ट प्रमाण मानले तर भारतातल्या सर्व नद्यांवर अगडबंब धरणे बांधून सर्व जंगले, जमीन, पैसा वापरूनही त्याची पूर्तता होणार नाही.

पुढे वाचा

दोन रस्ते

आजचे जग अशा वळणावर उभे आहे की, जिथून पुढे परस्परविरुद्ध दिशांनी जाणारे दोन रस्ते आहेत. एक रस्ता प्रचंड संपत्तीच्या निर्मितीचा, अमाप उपभोगाचा, परस्परांशी स्पर्धेचा आणि वैराच्या दिशेने जाणारा आहे; दुसरा रस्ता कार्ल मार्क्स म्हणतात तसा अशा ठिकाणी पोहोचणारा आहे की, जिथे मानवी विकासप्रक्रियेतील आनंददायी घटना घडणार आहेत. निसर्गातील सर्व उत्पादकस्रोत माणूस अशा रीतीने विकसित करेल की, माणूस आणि निसर्ग ह्यातील द्वंद्व पूर्ण मिटून जाईल आणि त्याच्या इतिहासाचे नवे युग, ore of खऱ्या मानवी इतिहासाचे युग सुरू होईल. या युगातील अर्थशास्त्रावर भगवान बुद्धांच्या मध्यममार्गाचा प्रभाव असेल आणि त्यातील माणसे त्यांच्या जगण्याच्या प्रक्रियेत बुद्धांचा आर्य अष्टांगिक मार्ग अनुसरतील.

पुढे वाचा

शेतीची भावी दिशा

श्रीमंत तसेच गरीब देशातील शेतीमध्ये एकलपीक पद्धतीऐवजी बहुपीक पद्धतीचा स्वीकार, रासायनिक खते व शेतीतील अन्य निविष्टे ह्यांचा कमी वापर, लहान शेतकऱ्यांना अधिक साह्य आणि उत्पादन व वापर ह्यांच्या बाबतीत स्थानिक बाबींवर भर, असे परिवर्तन करणे आता अपरिहार्य झाले आहे. त्यासाठी छोट्या शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविणाऱ्या आणि ग्रामीण विकासास चालना देणाऱ्या, शेतीचे पुनरुज्जीवन करणाऱ्या शाश्वत उत्पादनपद्धतींचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात यावा असे आम्ही सुचवितो. एकलपीक पद्धत व औद्योगिक शेतीमुळे गरज आहे तेथे पुरेसे अन्न लोकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे शक्य होत नाही.

पुढे वाचा

सेक्युलॅरिझमचा अर्थ

एकनाथांचे तत्त्वज्ञान हे धर्माधर्मांमधील सामंजस्य वाढून त्यांच्यात संवाद प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. एकनाथांचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या संवाद सामंजस्यासाठी ते या दोन्ही धर्मांची गुळमुळीत तरफदारी करीत नाहीत. त्यांच्यातील मूलतत्त्ववादी प्रवृत्तीला प्रोत्साहन देत नाहीत. आपल्या संविधानातील सेक्युलॅरिझम या तत्त्वाची ओढाताण करीत बुद्धिवाद्यांनी त्याचा धर्मउच्छेदक अर्थ लावला तर सर्वधर्मसमभाववाद्यांनी त्याचा अर्थ शासनाने धर्मांत साक्षेप न करता सर्व धर्मांचे सारखे कौतुक व सारखे चोचले असा घेतला. त्यामुळे सर्वच धर्मांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या. एकीकडे शहाबानो प्रकरणात घटनादुरुस्ती करायची व दुसरीकडे बाबरी मशिदीचे कुलूप उघडायचे अशी दुहेरी कसरत सुरू झाली.

पुढे वाचा

शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई

“तुम्ही तुमच्या शब्दांनी मला जखमी करा
डोळ्यांनी माझे तुकडे तुकडे करा
तुमच्या द्वेषाने मला ठार मारा
पण हवेतून वर मी परत उभी राहीन”

ती आठ वर्षाची होती तेव्हाच तिने बोलणे टाकले. त्याच वर्षी तिच्या आईच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला होता. तिच्या पोटातील तीव्र यातना, रक्त, खटकन्, ऊसकलेली तिची कंबर, या पेक्षा तिला सर्वात भयानक जाणीव होती ती तिच्या आवाजाने घेतलेल्या त्या नराधमाच्या प्राणाची ! न्यायालयात त्याच्या विरुद्ध तिने उंच आवाजाने भोकांड पसरल्यावर त्याला जोड्यांनी ठार मारण्यात आले होते. त्यानंतर ती पाच वर्ष आपल्या भावाशिवाय इतर कोणाशीच बोलली नाही.

पुढे वाचा

निवेदन : सामाजिक समता केंद्र

नितिन आगे हत्येमुळे दलितांवरील अत्याचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मोहसीन शेखच्या हत्येने धर्मांध राजकारणाचा धोका स्पष्ट केला आहे. आदिवासी आणि भटक्या जमातींच्या लोकांवर आणि स्त्रियांवर होणारे अत्याचार ही तर नित्याचीच गोष्ट आहे. या घटना थांबल्याच पाहिजेत. दलित, आदिवासी, भटके, आदी पददलितांना आणि अल्पसंख्याक व स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी निरनिराळ्या आघाड्यांवर कामगार कर्मचारी संघटना, सामाजिक संस्था, – प्राध्यापक शिक्षक संघटना, महिला संघटना अशा संस्था व व्यक्तींनी खारीचा वाटा उचलला आणि अशा कामांमध्ये समन्वय साधला तर निश्चित प्रगती साधता येईल. त्यासाठी आपल्या गावात सामाजिक समता केंद्र स्थापन करावे व त्यामार्फत प्रबोधनात्मक व कृतिशीलतेचे काम करावे, असा प्रस्ताव ठेवत आहोत.

पुढे वाचा

प्रिय मोदी,

भारतातील सर्व धार्मिक अल्पसंख्यकांच्या मनावर ओरखडे उमटलेले आहेत. फक्त मुस्लिमच नव्हे तर पश्चिम पंजाबमधून विस्थापित झालेले हिंदू व शीख तसेच काश्मीरी पंडितही असे ओरखडे बाळगून आहेत. खऱ्याखुऱ्या किंवा घडवून आणलेल्या चिथावणीमुळे अचानक दंगली भडकण्याचे व त्याचा अनेकपटीने, सूड घेण्यासाठी महिलांना लक्ष्यित केले जाईल ह्याचे भय सगळ्यांच्या मनात आहे. दलित, आदिवासी व विशेषतः स्त्रिया त्यांच्या आयुष्यातील मिनिटामिनिटाला अवहेलना व शोषण ह्यांचाच अनुभव घेत आहेत. अवमान, भेदाभेद आणि दडपशाही ह्यांच्यामुळे सतत मानगुटीवर बसणारी अस्वस्थता ही नागरिक म्हणून द्यावयाचा साधा सन्मान, नीतिमत्ता आणि माणुसकी हिरावून घेणारीच असते.

पुढे वाचा