गं. बा. सरदार - लेख सूची

वस्तुवादी इतिहास-मीमांसा

वस्तुवादी इतिहास-मीमांसा कार्ल मार्क्सने सामाजिक इतिहासाकडे पाहण्याचा जो एक विशिष्ट दृष्टिकोण बसविला आहे, त्याला ‘वस्तुवादी इतिहास-मीमांसा’ या नावाने संबोधणेच योग्य होईल. पण या ठिकाणी ‘वस्तू’ हा शब्द केवळ जडसृष्टी-पुरताच मर्यादित नाही. भौतिक परिस्थितीशी सुसंगत असल्यामुळे जन-मनाची पकड घेणाऱ्या विचारप्रवाहांचाही त्यात अंतर्भाव होतो. हा दृष्टि-कोण म्हणजे कुठल्याही देशातील कोणत्याही ऐतिहासिक घटनांचा हुकमी अन्वयार्थ लावण्याचा सांप्रदायिक गुरुमंत्र …