गोपाळ गणेश आगरकर / गोपाळ कृष्ण गोखले - लेख सूची

सुधारकाचे जाहीर पत्रक

ज्यांना हिंदुस्थानचा इतिहास यत्किंचित् अवगत असेल, त्यांना येथे इंग्रजांचा अंमल कायम होण्यापूर्वी आमची स्थिती कशी होती, व तो झाल्यापासून तींत किती बदल झाला आहे आणि पुढे किती होण्यासारखा आहे, हे स्वल्प विचाराअंती समजण्यासारखें आहे. मोंगलांच्या तीन-चारशे वर्षांच्या, किंवा मराठ्यांच्या दीडदोनशे वर्षांच्या अमलांत ज्या राज्यविषयक, समाजविषयक, नीतिविषयक व शास्त्रविषयक विचारांचा लोकांत आविर्भाव झाला नाही, ते विचार …