गो. ग. आगरकर - लेख सूची

आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील?

अलीकडल्या इंग्रज लोकांनी किंवा युरोपातील दुसऱ्या कोणत्याही लोकांनी कितीही शेखी मिरविली तरी ज्या आम्ही इतक्या पुरातन काळी येवढी मोठी सुधारणा करून बसलो त्या आमच्यापुढे त्यांची मात्रा बिलकुल चालावयाची नाही! …. पण या एककल्ली देशाभिमान्यांना आम्ही असे विचारतो की, बाबांनो, तुम्ही अशा प्रकारे गतवैभवाचे गाणे गाऊ लागला म्हणजे तुमच्या पक्षाचे मंडन न होता उलट मुंडण होते! …