जेम् ब्राझिल - लेख सूची

विवाहाचा रोग

विवाह हा समाजाला जडलेला एक रोग आहे, आणि त्याच्या परिणामी उत्पन्न होणारी विवाहसंस्था ही जुलमी राज्यकारभाराला पोषक होते हे माहीत असूनही राजकीय जुलमाविरुद्ध झगडणारे लोक तिकडे लक्ष देत नाहीत. राजकीय जुलमाच्या ज्या ज्या पद्धती आहेत, त्या सर्व बीजरूपाने कुटुंबसंस्थेत आढळतात. अनियंत्रित सत्ता, सत्ताधान्याची प्रचंड शक्ती, शिक्षणाच्या व न्यायाच्या सबबीवर केलेले कायदे आणि शिक्षा, मृत्युदंडाचा अधिकार, …