तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी - लेख सूची

अध्यात्मवादी टिळक व भौतिकवादी आगरकर

[एक ऑगस्ट ही लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. १८५६ मध्ये जन्मलेल्या दोन माणसांच्या विचारांचा ठसा महाराष्ट्राच्या पुढच्या सबंध सामाजिक इतिहासावर उमटलेला आहे. ज्या दोन भिन्न दिशांना समाजाला घेऊन जाण्याचा प्रयत्न या समाजातल्या शक्ती करत आल्या आहेत व आजही करत आहेत, त्या दिशा या दोघांच्या विचारांत सूचित झालेल्या होत्या. आणि या दोन दिशांमागे होती दोन जीवनविषयक तत्त्वज्ञाने : …