नंदा खरे/पद्मजा फाटक - लेख सूची

मजेत

पद्मजा फाटक वारल्या. अनेक व्याधी, ‘रोपण’ केलेले मूत्रपिंड, त्या मूत्रपिंडाला शरीराने स्वीकारावे यासाठीची औषधयोजना, त्या औषधांचे दुष्परिणाम टाळायला (किंवा सौम्य करायला) आणखी औषधयोजना; अशा साऱ्यांशी बावीस-तेवीस वर्षे झगडून सत्तरच्या वयात ६ डिसेंबर २०१४ ला पद्मजांनी ‘देह ठेवला’ ‘आजचा सुधारक’चा आणि त्यांचा जुना स्नेह. दि. य. देशपांडे, प्र. ब. कुलकर्णी, मी, साऱ्यांशी तसाच जुना स्नेह. शिक्षणाने …